Friday, October 3, 2025

तोच स्नेह, तीच अनुभूती..

31 Jan, 2025 तोच स्नेह, तीच अनुभूती..
चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांचा सन्मान व पत्रकारितेची 25वर्षे पूर्ण केलेल्यांच्या गौरव समारंभानिमित्त पुन्हा एकदा गावाकडील मित्रांचा स्नेह अनुभवण्याची संधी लाभली. पाच-सहा महिन्यांपूर्वी जळगाव मधील सुत्रे स्वीकारल्यावर लोकमत वर्धापन दिनानिमित्त सुमारे 35 वर्षानी जाहीर कार्यक्रमासाठी चाळीसगावी गेलो होतो, त्यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून जाणे झाले. विशेष म्हणजे, ज्या रघुनंदन शर्मा तथा भैय्याजी यांच्याकडे मी माझ्या पत्रकारितेची बाराखडी गिरवली त्या गुरुवर्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचे सद्भाग्य यानिमित्त मला लाभले ही माझ्यासाठी खूप मोठी व अविस्मरणीय बाब. लोकशाहीचे स्तंभ म्हणवणारे चारही क्षेत्रातील मान्यवर येथे एका व्यासपीठावर होते, त्यामुळे पत्रकारिता आणि समाजभान या विषयावर मनमुक्तपणे बोललो. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावर स्नेहींचा असा गराडा पडला, की आयोजकांना गौरवार्थींचे समूह छायाचित्रही नीट घेता आले नाही. व्यवस्था काहीशी गडबडली, पण जुन्या मित्रांचा स्नेह व भेटीचा ओढा असा की मन भरून आले. आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, नगर परिषदेचे प्रशासक सौरभ जोशी, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी आदी व्यासपीठावर समवेत होते. Thanks to Organizer RD Choudhary, MB Patil, Jijabrao wagh, Aanan Shimpi n Dear all... आपल्यामुळे या स्नेहाची पुन्हा अनुभूती घेता आली. #KiranAgrawal #Chalisgaon

No comments:

Post a Comment