Friday, October 3, 2025

माय मराठीच्या संवर्धनासाठी...

16 Jan, 2025 माय मराठीच्या संवर्धनासाठी...
ज्ञानार्जन व संवाद सुलभतेसाठी अन्य भाषा अवगत असणे गरजेचे आहे हे मान्यच, त्यांचा दुस्वास करण्याचे कारण नाही; मात्र अनावश्यकरित्या अंगीकारले गेलेले इंग्रजाळलेपण बाजूस ठेऊन मातृभाषा म्हणून आपल्या माय मराठीचा प्राधान्याने वापर होणे आवश्यक आहे. बोकाळलेल्या व्हाट्सअप कल्चरमध्ये सकाळी सकाळी गुड मॉर्निंग ऐवजी सुप्रभात करण्यासारख्या छोट्या छोट्या बाबीतून मराठीचे संवर्धन करता येईल... कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा प्रशालेतर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करतांना असे काही मुद्दे मांडले. अध्यक्षस्थानी सन्मित्र व प्रशालेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे होते. मराठी भाषा विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी संतांचे जीवन व त्यांच्या साहित्यावर काढलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशनही केले. या पंधरवड्यात मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यातून मराठीचा जागर घडून येईल व भाषा संवर्धनाची जाणीव रुजेल असा विश्वास आहे. धन्यवाद प्राचार्य डॉ. पगारे सर, आपल्याशी असलेल्या ऋणानुबंधातून हा योग जुळून आला... Kiran Agrawal #किरण_अग्रवाल #मराठीभाषा

No comments:

Post a Comment