Friday, October 3, 2025

पुरातत्वाच्या सानिध्यात... Waghli

28 Jan, 2025 पुरातत्वाच्या सानिध्यात...
चाळीसगाव येथील तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी आज जळगाव येथून निघालो असता कार्यक्रमास काहीसा वेळ असल्याने वाटेत वाघळी येथील मुधाई देवी मंदिरात दर्शनासाठी थांबलो. इस 1150 ते 1200 च्या दरम्यानची निर्मिती असलेले हे पूर्वमुखी मंदिर 24 खांबांवर तोललेले आहे. पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले हे मंदिर आज भग्नावस्थेत असून त्यास जीर्णोद्धाराची प्रतीक्षा आहे. माझ्या जुन्या आठवणी या मंदिराशी जुळल्या आहेत. बालपणी पातोंडा येथे असताना वडील व फडतरे सरांबरोबर सायंकाळी अनेकदा पायी पायी या मंदिरात आलो आहे. येता जातांना रस्त्यावरील चिंचेच्या झाडांना दगडे मारून खिसाभर चिंचा गोळा केल्या आहेत. विजयादशमीला सोने लुटायला आम्ही येथेच येत असू. त्यामुळे सुमारे 50 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आज येथे थांबल्यावर बालपणीच्या जुन्या आठवणी दाटून आल्या. चाळीसगाव येथील कार्यक्रमात व्यासपीठावर सोबत असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे या मंदिर परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास घडविण्याची विनंतीही केली. **** यावेळी समवेत असलेले कजगाव येथील प्रतिनिधी प्रमोद ललवाणी यांनी टिपलेले छायाचित्र... #KiranAgrawal #MudhaideviMandirWaghli

No comments:

Post a Comment