Friday, October 3, 2025

क्रीडा नैपुण्याला दाद...

21 Jan, 2025 क्रीडा नैपुण्याला दाद...
'लोकमत महागेम्स 2025' मध्येजळगाव जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक शाळा सहभागी झाल्या. फुटबॉल व खोखो सारख्या खेळात तब्बल 14 ते 17 संघ सहभागी झाले. फुटबॉलचा अंतिम सामनाही चुरशीचा झाला. या अंतिम सामन्याची नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी सुंदर नियोजन केले. पोलीस ग्राउंडवर स्केटिंगच्या स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. लहान लहान बालकांचा यातील सहभाग आनंददायी होता. विविध प्रकारातील क्रीडा नैपुण्याला जळगावकरांचीही भरभरून दाद लाभली. लोकमत कॅम्पस क्लबद्वारे घेतले गेलेले महागेम्स व मॅरेथॉनसारख्या आयोजनांच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला बळ देण्यासाठी रुचिरा दर्डा यांनी चालविलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatMahaGames #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatCampusClub

No comments:

Post a Comment