Friday, October 3, 2025

अपूर्व उत्साह व ऊर्जादायी सोहळा ! Jalgaon Lokmat Anni. 2024

15 Dec, 2024 अपूर्व उत्साह व ऊर्जादायी सोहळा !
सुवर्ण महोत्सवाच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकमत जळगाव आवृत्तीने 15 डिसेंम्बर रोजी 47 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 48व्या वर्षात पाऊल ठेवले, यानिमित्त आयोजित वर्धापन दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून 'लोकमत'वर शुभेच्छांचा वर्षाव केला. कडाक्याच्या थंडीतही मान्यवर वाचक व हितचिंतकांच्या भेटीगाठींचा सिलसिला उशिरापर्यंत सुरूच होता. त्यातून लाभलेली ऊर्जा हेच आमचे बळ. आपल्या साऱ्यांचे हे पाठबळ हीच लोकमतची खरी शक्ती.
लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा तसेच लोकमतचे नेतृत्वकर्त्या नवीन पिढीचे सर्वश्री. देवेन्द्रबाबूजी, ऋषीबाबूजी, करणबाबूजी दर्डा व संपूर्ण व्यवस्थापनानेही वाचकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. धन्यवाद खान्देशकर वाचकांनो, हा स्नेह असाच कायम असू द्या हीच विनंती.. #LokmatJalgaon #LokmatJalgaonAnniversary2024 #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment