Friday, October 3, 2025

'लोकमत'मधील दिवाळी स्नेह सोहळा... 2024

31 Oct, 2024
'लोकमत'मधील दिवाळी स्नेह सोहळा... लोकमत हा एक मोठा परिवार आहे. कार्यालयीन कामाच्या व्यतिरिक्त येथील प्रत्येक सहकारीचा परस्परांशी प्रगाढ नात्याचा भावबंध जुळला आहे. लोकमतचे संस्थापक संपादक ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी ही पारिवारिकता प्रत्येकाच्या मनात रुजवली आणि पुढे आमचे चेअरमन डॉ विजय बाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ राजेंद्र बाबूजी दर्डा यांनी या भावनेला अधिक बळकटी दिली. आनंद याचा की, नवे नेतृत्व सर्वश्री देवेन्द्रबाबूजी, ऋषीबाबूजी व करणबाबूजी दर्डा यांनीही या भावनेची उत्तरोत्तर जोपासना चालविली आहे. याच अनुबंधातून लोकमतमधील सर्व सहकारींचा दिवाळी निमित्त स्नेह सोहळा घेण्यात आला. यावेळी रंगलेल्या गुजगोष्टीत दिवाळी व निवडणुकीमुळे ओढवलेला कामाचा ताण नाहीसा झाला. Thanks to our Unit Head Mr. Rastogi ji n Admin. Head Mr. Dhiraj Teni ji... #LokmatJalgaon #LokmatDiwali

No comments:

Post a Comment