Friday, October 3, 2025

सखींचा संक्रांत मेळावा JALGAON 2025

04 Feb, 2025 सखींचा संक्रांत मेळावा ...
लोकमत सखींचा संक्रांत मेळावा जळगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यात आयोजिण्यात आलेल्या फॅशन शो, हेअर स्टाईल यासारख्या विशेष स्पर्धांसाठी तयार होऊन आलेल्या भगिनींनी बालगंधर्व खुले नाट्यगृह अक्षरशा ओसंडून वाहिले इतका यास प्रतिसाद लाभला. आद. ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थापन केलेल्या या व्यासपीठावर भारतीय सणवारांचे जे सोहळे साजरे होतात, त्यातून संस्कृती संवर्धनालाच बळ लाभून जात आहे. माजी महापौर सीमाताई भोळे, आनंद हॉस्पिटलचे डॉ. अमित व डॉ. नेहा भंगाळे, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, डॉ गौरव महाजन, डॉ. आकांशा कुलकर्णी, डॉ. प्रीती भारुडे, डॉ. अमृता सोनवणे आदींच्या हस्ते यावेळी लोकमत सखी बुक व ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगीची ही काही आठवण चित्रे... Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #SakhiSankrant #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment