At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Friday, October 3, 2025
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 30 March 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250330_8_1&fbclid=IwY2xjawNMq8hleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR7yCm0SHagcshjxe834OlYxdzN0EgEenTLG88H7n3YxtPx_GAF5zRnS_7exrw_aem_AwZpd7c8ieHqz6sp4eONcA
Lokmat Ideal Women Achievers Award 2025 ...
29 March 2025
Lokmat Ideal Women Achievers Award 2025 ...
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यकुशलतेची नाममुद्रा उमटविणाऱ्या भगिनींचा लोकमत आयडियल वूमन आचिव्हर्स अवॉर्ड्स 2025ने जळगाव येथे गौरव करण्यात आला.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजुमामा भोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, सातपुडा ऑटोमोबाईल्सचे संचालक किरण बच्छाव व चित्रपट अभिनेत्री मीरा जगन्नाथ यांच्या हस्ते हा सन्मान झाला.
याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे .. Kiran Agrawal
#LokmatWomenAchieversAwards2025
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 23 March 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250323_6_1&fbclid=IwY2xjawNMqdVleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR5s-5V7vKjwukNNt0TClUi68bNXmsGOes3Ateti1VvIarUd33yPc32SaVyGdA_aem_nWCi4k66CPSoHJzv9dcTPA
Holi at Lokmat Jalgaon 2025
19 March 2025
लोकमतच्या हिरवळीवर कार्यालयीन सहकाऱ्यांसमवेत ...
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 16 March 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250316_2_1&fbclid=IwY2xjawNMqHxleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR6j9RX3e4oLBHFw3bd_oMb3NqcWOyPcPuNumBYL9_5QcyIR59LEFnKreMAJjQ_aem_saTTAj79KhjsJnEmfvENCw
लोकनायकांचा गौरव... Dhule 2025
12 March 2025
लोकनायकांचा गौरव...
धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारात आपल्या कार्य कुशलतेची मोहर उमटविणाऱ्या मान्यवरांचा लोकमत लोकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
धुळे येथील गणपती पॅलेसमध्ये झालेल्या या सोहळ्यास माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपाचे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
#LokmatLoknayakPuraskar #LokmatDhule #LokmatJalgaonEvent #LoknayakPuraskarDhule2025 #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Lokmat Jalgaon 0n 09 March 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250309_2_1&fbclid=IwY2xjawNMpotleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR77afXWT5mWtqinM6aDIbSBwMrZnRFPLYo1j5QJw0sdW1OQjIGMd1aXjUFMJw_aem_OYj_WrFNSuUzPGi90FriIw
शिलेदारांचा सन्मान Jalgaon 2025
05 March 2025
शिलेदारांचा सन्मान...
समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीची मुद्रा उमटवीत निष्ठा व समर्पण भावाने शिलेदारासारखे काम करणाऱ्या जळगावमधील मान्यवरांचा लोकमत शिलेदार सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, विधिज्ञ संजय राणे, लोकमतचे उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यावेळी समवेत होते.
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatShiledarSanman2025 #KiranAgrawalLokmatJalgaon
Article on Babulance in Lokmat on 04 March 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250304_6_3&fbclid=IwY2xjawNMoKlleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR4PDJgNM1XjmHXOa_K6OAjpukY6lSe7djXgbuf3HF7PQxZUArhX9wbR2NepVQ_aem_iGq0W2yzd7puctICiE7nwg
https://www.lokmat.com/editorial/are-not-the-citizens-of-the-state-who-are-giving-alms-in-bambulance-a-a520-c719/?fbclid=IwY2xjawNMoPxleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR7KaE4k32Fa0ag3QvC11he6ER5cKwdMAoCwB4x4tuViPIPX8__1p_Hzs5bsOQ_aem_xVcCPFWI4nCWGfz7bPWxyw
लोकमत सखी कार्निवल 2025
03 March 2025
लोकमत सखी कार्निवल उत्साहात...
लोकमत सखीच्या रौप्य महोत्सवी वर्षांतर्गत सखी कार्निव्हल मोठ्या उत्साहात पार पडला. जळगाव जिल्ह्यातील सखींची मोठी उपस्थिती व विविध स्पर्धांमध्ये सहभाग यात लाभला.
स्टार प्रवाहच्या 'लक्ष्मीच्या पावलांनी..' या मालिकेतील अभिनेते किशोरी अंबिये व अक्षर कोठारी यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली... Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatSakhi #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 02 March 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250302_4_1&fbclid=IwY2xjawNMnzBleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR6L4Y_Uj7A0qKUgb3JWAprZ5oPpAQFRDZSW5pUhEf6FSN_PBKVJvZoGrpc__g_aem_YrkYihzOV0OslK71dg7IRA
लोकमत सखींची बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप 2025
27 Feb, 2025
लोकमत सखींची बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप...
लोकमत सखीतर्फे आयोजित वुमन्स बॉक्स क्रिकेट चॅम्पियनशिप 2025 मध्ये विविध नऊ संघांनी सहभाग घेऊन क्रिकेटचा आनंद घेतला.
जळगावच्या गणेश कॉलनीतील ए 1 टर्फवर झालेल्या या सामन्याच्या वेळी नार्दन हॉस्पिटलचे डॉ मनीष चौधरी, आयएमए सचिव डॉ. अनिता भोळे, विविध संघ नायक व गौरव रस्तोगी आदी मान्यवरांसह...
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #KiranAgrawalLokmatJalgaon
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 23 Feb, 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250223_2_1&fbclid=IwY2xjawNMnblleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR4PDJgNM1XjmHXOa_K6OAjpukY6lSe7djXgbuf3HF7PQxZUArhX9wbR2NepVQ_aem_iGq0W2yzd7puctICiE7nwg
राजेंना मानाचा मुजरा!!
19 Feb, 2025
राजेंना मानाचा मुजरा!!
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती तसेच जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने भव्य शोभायात्रा काढून राजेंना वंदन करण्यात आले.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुषप्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा परिषद मुख्य कार्य. अधिकारी अंकित, उत्सव समिती अध्यक्ष प्रतिभा शिंदे, करीम सालार, विष्णू भंगाळे, सुरेंद्र पाटील आदी मान्यवरांसमवेतची सहभाग चित्रे.
शिवजयंतीनिमित्त शिवतीर्थावर मराठा प्रीमियर लीगतर्फे शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचे प्रदर्शनही भरविण्यात आले आहे. राजेंच्या शौर्याची गाथा आणि आरमाराची व्यवस्था यातून उलगडते. यावेळी राहुल पवार, अनिल जोशी, हर्षल पाटील समवेत होते.
#Shivjayanti2025 #KiranAgrawal
Saraunsh published in Lokmat Jaigaon on 16 Feb, 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250216_4_1&fbclid=IwY2xjawNMnBhleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR4iIW89-nOZLfp2KmVXYHOWCGG7Q-vjyfvFEU0C12fvVErN8BsAh4_1byJC3g_aem_DhIi7ZG-d4y4-gnM9wC-Aw
नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो ... 2025
15 Jan, 2025
नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो ...
नरेडको या संस्थेतर्फे जळगावच्या सागर पार्कवर नाशिक प्रॉपर्टी एक्सपो लावण्यात आले आहे.
जळगाव खान्देशातील अनेकांची नाशिकशी कनेक्टिव्हिटी आहे. कुणी उद्योग व्यवसायासाठी तिकडे गेले आहे, तर कुणी नोकरीसाठी. अनेकांची मुले शिक्षणासाठी नाशकात आहेत. अशांना नाशकात आपले हक्काचे घर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्यासाठी हे प्रदर्शन उपयोगी ठरावे.
या एक्सपोनिमित्त नाशकातील उदयोन्मुख भु-विकासकांच्या भेटी झाल्या. नाशिकचा विकास व जळगावमध्ये त्यासाठी असलेल्या संधी यावर छान चर्चा झाली.
नरेडकोचे नाशिकचे अध्यक्ष सुनील गवांदे, सचिव शंतनु देशपांडे यांनी आपलेपणाने स्वागत केले. भूषण महाजन, प्रशांत पाटील, शशांक देशपांडे, लोकमत जळगावच्या ॲड मार्केटिंगचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरज धाये यावेळी समवेत होते.
#KiranAgrawal #NashikPropertyExpo #NaredcoNashik
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 09 Feb, 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250209_2_1&fbclid=IwY2xjawNMmr1leHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR77afXWT5mWtqinM6aDIbSBwMrZnRFPLYo1j5QJw0sdW1OQjIGMd1aXjUFMJw_aem_OYj_WrFNSuUzPGi90FriIw
सखींचा संक्रांत मेळावा JALGAON 2025
04 Feb, 2025
सखींचा संक्रांत मेळावा ...
लोकमत सखींचा संक्रांत मेळावा जळगावमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यात आयोजिण्यात आलेल्या फॅशन शो, हेअर स्टाईल यासारख्या विशेष स्पर्धांसाठी तयार होऊन आलेल्या भगिनींनी बालगंधर्व खुले नाट्यगृह अक्षरशा ओसंडून वाहिले इतका यास प्रतिसाद लाभला.
आद. ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्थापन केलेल्या या व्यासपीठावर भारतीय सणवारांचे जे सोहळे साजरे होतात, त्यातून संस्कृती संवर्धनालाच बळ लाभून जात आहे.
माजी महापौर सीमाताई भोळे, आनंद हॉस्पिटलचे डॉ. अमित व डॉ. नेहा भंगाळे, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, डॉ गौरव महाजन, डॉ. आकांशा कुलकर्णी, डॉ. प्रीती भारुडे, डॉ. अमृता सोनवणे आदींच्या हस्ते यावेळी लोकमत सखी बुक व ओळखपत्राचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगीची ही काही आठवण चित्रे... Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #SakhiSankrant #KiranAgrawalLokmatJalgaon
अभिनयाखेरीजचे पत्रकारितेचे बंध...
03 Feb, 2025
अभिनयाखेरीजचे पत्रकारितेचे बंध...
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या बैठकीनिमित्त जळगावी आलेले या मंडळाचे अध्यक्ष तथा प्रख्यात अभिनेते विजय गोखले यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट देऊन सहकाऱ्यांसमवेत संवाद साधला.
विजयदादांचा व माझा स्नेह नाशिकपासूनचा. त्यांचे पिताश्री श्रद्धेय विद्याधर गोखले संगीत नाटककार होतेच, पण ते लोकसत्तेचे संपादकही होते आणि त्यानंतर खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यामुळे अण्णांच्या पत्रकारितेच्या धाग्याने व स्व. हेमंतराव कुलकर्णी यांच्या माध्यमातून आमची नाळ जुळली. अभिनयाखेरीजच्या याच बंधातून ते भेटले आणि गप्पांमध्ये रंगले.
त्यांच्यासमवेत मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ रंगकर्मी संजय भाकरे, मुकुंद पटवर्धन, धर्मवीर चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारलेले मकरंद पाध्ये, प्रख्यात एकपात्रिकार रमेश थोरात, विश्वनाथ निळे, जळगावच्या गीतांजली ठाकरे आदी मान्यवरही उपस्थित होते. छान चर्चा झाली.
#LokmatJalgaon #KiranAgrawal #VijayGokhle
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 02 Feb, 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250202_4_1&fbclid=IwY2xjawNMmDhleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR77afXWT5mWtqinM6aDIbSBwMrZnRFPLYo1j5QJw0sdW1OQjIGMd1aXjUFMJw_aem_OYj_WrFNSuUzPGi90FriIw
तोच स्नेह, तीच अनुभूती..
31 Jan, 2025
तोच स्नेह, तीच अनुभूती..
चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाने आयोजित केलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांचा सन्मान व पत्रकारितेची 25वर्षे पूर्ण केलेल्यांच्या गौरव समारंभानिमित्त पुन्हा एकदा गावाकडील मित्रांचा स्नेह अनुभवण्याची संधी लाभली.
पाच-सहा महिन्यांपूर्वी जळगाव मधील सुत्रे स्वीकारल्यावर लोकमत वर्धापन दिनानिमित्त सुमारे 35 वर्षानी जाहीर कार्यक्रमासाठी चाळीसगावी गेलो होतो, त्यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून जाणे झाले. विशेष म्हणजे, ज्या रघुनंदन शर्मा तथा भैय्याजी यांच्याकडे मी माझ्या पत्रकारितेची बाराखडी गिरवली त्या गुरुवर्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देण्याचे सद्भाग्य यानिमित्त मला लाभले ही माझ्यासाठी खूप मोठी व अविस्मरणीय बाब.
लोकशाहीचे स्तंभ म्हणवणारे चारही क्षेत्रातील मान्यवर येथे एका व्यासपीठावर होते, त्यामुळे पत्रकारिता आणि समाजभान या विषयावर मनमुक्तपणे बोललो. कार्यक्रम संपल्यावर व्यासपीठावर स्नेहींचा असा गराडा पडला, की आयोजकांना गौरवार्थींचे समूह छायाचित्रही नीट घेता आले नाही. व्यवस्था काहीशी गडबडली, पण जुन्या मित्रांचा स्नेह व भेटीचा ओढा असा की मन भरून आले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, नगर परिषदेचे प्रशासक सौरभ जोशी, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी आदी व्यासपीठावर समवेत होते.
Thanks to Organizer RD Choudhary, MB Patil, Jijabrao wagh, Aanan Shimpi n Dear all... आपल्यामुळे या स्नेहाची पुन्हा अनुभूती घेता आली.
#KiranAgrawal #Chalisgaon
पुरातत्वाच्या सानिध्यात... Waghli
28 Jan, 2025
पुरातत्वाच्या सानिध्यात...
चाळीसगाव येथील तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाच्या कार्यक्रमासाठी आज जळगाव येथून निघालो असता कार्यक्रमास काहीसा वेळ असल्याने वाटेत वाघळी येथील मुधाई देवी मंदिरात दर्शनासाठी थांबलो.
इस 1150 ते 1200 च्या दरम्यानची निर्मिती असलेले हे पूर्वमुखी मंदिर 24 खांबांवर तोललेले आहे. पुरातत्व विभागाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलेले हे मंदिर आज भग्नावस्थेत असून त्यास जीर्णोद्धाराची प्रतीक्षा आहे.
माझ्या जुन्या आठवणी या मंदिराशी जुळल्या आहेत. बालपणी पातोंडा येथे असताना वडील व फडतरे सरांबरोबर सायंकाळी अनेकदा पायी पायी या मंदिरात आलो आहे. येता जातांना रस्त्यावरील चिंचेच्या झाडांना दगडे मारून खिसाभर चिंचा गोळा केल्या आहेत. विजयादशमीला सोने लुटायला आम्ही येथेच येत असू. त्यामुळे सुमारे 50 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आज येथे थांबल्यावर बालपणीच्या जुन्या आठवणी दाटून आल्या.
चाळीसगाव येथील कार्यक्रमात व्यासपीठावर सोबत असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे या मंदिर परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास घडविण्याची विनंतीही केली.
****
यावेळी समवेत असलेले कजगाव येथील प्रतिनिधी प्रमोद ललवाणी यांनी टिपलेले छायाचित्र...
#KiranAgrawal #MudhaideviMandirWaghli
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 26 Jan, 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250126_4_1&fbclid=IwY2xjawNMkPJleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR6j9RX3e4oLBHFw3bd_oMb3NqcWOyPcPuNumBYL9_5QcyIR59LEFnKreMAJjQ_aem_saTTAj79KhjsJnEmfvENCw
सूर्योदय साहित्य संमेलन... 2025
23 Jan, 2025
सूर्योदय साहित्य संमेलन...
जळगाव येथील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय 22वे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन प्राचार्य डॉ. संजीव गिरासे (धुळे) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच अभियंता भवनात उत्साहात पार पडले.
या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याची संधी मिळाल्याने मान्यवर साहित्यिक व जुन्या मित्रांच्या भेटी घडून आल्या. संमेलनाचे उद्घाटन नाशिकच्या साहित्यिका प्रा. सुमनताई मुठे यांच्या हस्ते करण्यात आले, तर अभियंता साहेबराव देवराम पाटील, प्रा. डॉ. तुषार चांदवडकर, प्र. द. कुलकर्णी, मिलिंद चिंधडे, भगवान पाटील, प्रा. म. सु. पगारे, डी. बी. महाजन आदींचा यात सक्रिय सहभाग होता.
मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी सरकारी अनुदानाऐवजी लोकवर्गणीतून ही संमेलने चालविली आहेत ही यातील विशेष बाब. धन्यवाद सतीश जी, आपल्या या धडपडीचे कौतुक आहे
#SuryodayJalgaon #SuryodaySahityaSammelan #KiranAgrawal
क्रीडा नैपुण्याला दाद...
21 Jan, 2025
क्रीडा नैपुण्याला दाद...
'लोकमत महागेम्स 2025' मध्येजळगाव जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक शाळा सहभागी झाल्या. फुटबॉल व खोखो सारख्या खेळात तब्बल 14 ते 17 संघ सहभागी झाले.
फुटबॉलचा अंतिम सामनाही चुरशीचा झाला. या अंतिम सामन्याची नाणेफेक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी सुंदर नियोजन केले.
पोलीस ग्राउंडवर स्केटिंगच्या स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. लहान लहान बालकांचा यातील सहभाग आनंददायी होता. विविध प्रकारातील क्रीडा नैपुण्याला जळगावकरांचीही भरभरून दाद लाभली.
लोकमत कॅम्पस क्लबद्वारे घेतले गेलेले महागेम्स व मॅरेथॉनसारख्या आयोजनांच्या माध्यमातून क्रीडा संस्कृतीला बळ देण्यासाठी रुचिरा दर्डा यांनी चालविलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatMahaGames #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatCampusClub
Saraunsh published in Lokmat Jalgaon on 19 Jan, 2025
https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20250119_2_3&fbclid=IwY2xjawNMjlFleHRuA2FlbQIxMABicmlkETBNSGFWbklIZklNTWFvZFJ1AR7KaE4k32Fa0ag3QvC11he6ER5cKwdMAoCwB4x4tuViPIPX8__1p_Hzs5bsOQ_aem_xVcCPFWI4nCWGfz7bPWxyw
लोकमत महागेम्स ... 2025
17 Jan, 2025
लोकमत महागेम्स ...
आजकाल मुलं ग्राउंडवर कमी आणि मोबाईलमध्ये जास्त अडकलेले दिसतात, पण तशातही सुमारे अडीच ते तीन हजार मुलं थंडीचा कडाका असतांनाही भल्या पहाटे ग्राउंडवर येऊन विविध स्पर्धांत खेळतांना संपूर्ण दिवस स्वतःला हरवून बसतात तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीयच ठरतो.
'लोकमत' कॅम्पस क्लब आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्कुल ऑलिम्पिक 2025 ठरलेल्या लोकमत महागेम्समुळे ही किमया घडून येते आहे.
जळगाव जिल्ह्यातील 50पेक्षा अधिक शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला असून छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये उत्साहात या गेम्सचे उद्घाटन पार पडले. विविध प्रकारच्या 11खेळांचा यात समावेश आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, स्माईलिंग नीजचे डॉ.मनिष चौधरी, नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सुर्यवंशी, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्रा. के. बी. पाटील, राष्ट्रीय फुटबॉलपटू सिद्धी ठाकरे, संस्कृती मेढे, ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष इकबाल मिर्झा तसेच फुटबॉल संघटनेचे सचिव फारुख शेख, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदींच्या उपस्थितीत या खेळांना प्रारंभ झाला. विविध क्रीडा प्रशिक्षकांना यावेळी लोकमततर्फे सन्मानित करण्यात आले. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatMahaGames #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatCampusClub
माय मराठीच्या संवर्धनासाठी...
16 Jan, 2025
माय मराठीच्या संवर्धनासाठी...
ज्ञानार्जन व संवाद सुलभतेसाठी अन्य भाषा अवगत असणे गरजेचे आहे हे मान्यच, त्यांचा दुस्वास करण्याचे कारण नाही; मात्र अनावश्यकरित्या अंगीकारले गेलेले इंग्रजाळलेपण बाजूस ठेऊन मातृभाषा म्हणून आपल्या माय मराठीचा प्राधान्याने वापर होणे आवश्यक आहे.
बोकाळलेल्या व्हाट्सअप कल्चरमध्ये सकाळी सकाळी गुड मॉर्निंग ऐवजी सुप्रभात करण्यासारख्या छोट्या छोट्या बाबीतून मराठीचे संवर्धन करता येईल...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा प्रशालेतर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन करतांना असे काही मुद्दे मांडले. अध्यक्षस्थानी सन्मित्र व प्रशालेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे होते.
मराठी भाषा विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी संतांचे जीवन व त्यांच्या साहित्यावर काढलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशनही केले.
या पंधरवड्यात मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यातून मराठीचा जागर घडून येईल व भाषा संवर्धनाची जाणीव रुजेल असा विश्वास आहे.
धन्यवाद प्राचार्य डॉ. पगारे सर, आपल्याशी असलेल्या ऋणानुबंधातून हा योग जुळून आला... Kiran Agrawal
#किरण_अग्रवाल #मराठीभाषा
Subscribe to:
Comments (Atom)


















































