Thursday, August 6, 2026

नंदुरबार 'लोकमत'चा वर्धापन दिन 2026

30 July, 2026 नंदुरबार 'लोकमत'चा वर्धापन दिन...
लोकमतच्या नंदुरबार विभागीय कार्यालयाचा 29वा वर्धापनदिन सोहळा नेहमीप्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी 'तीन दशकातील नंदुरबार' या विशेष पुरवणीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाची पताका फडकविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. ****
जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा आमदार चंद्रकांत भैय्या रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, काँग्रेसचे नेते राजेंद्रकुमार गावित, शहादा नगराध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष ऍड संजय पुराणिक, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. नंदुरबार लोकमतचे हॅलो हेड रमाकांत पाटील, सहकारी मनोज शेलार, भूषण रामराजे, सायसिंग पाडवी व जिल्ह्यातील वार्ताहर बंधूंनी यासाठी परिश्रम घेतले. लोकमतवर प्रेम करणाऱ्या नंदुरबारकर वाचकांचे मनःपूर्वक धन्यवाद ! Kiran Agrawal #LokmatNandurbar #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment