Thursday, August 6, 2026

लाभले सद्भाग्य आम्हा...

31 May, 2026
लाभले सद्भाग्य आम्हा...
प्रजाहितदक्ष, परोपकाराचा आदर्श पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज त्रिशतकोत्तर 301वी जयंती. योगायोगाने आज इंदुरमध्ये असल्याने होळकर राजवंशाच्या राजवाड्यावर जाऊन महाराणी साहेबांना वंदन केले. जयंती आयोजनाची सुरुवात करणारे डॉ. गणेश मतकर हे जळगाव जिल्ह्यातील पळासखेडेचे होते. त्यांचे कुटुंबीय व जयंती समितीच्या सर्व पदाधिकारींशी भेट झाली. मी जळगाव व विशेषता महाराष्ट्रातून म्हणजे अहिल्यादेवींच्या माहेरातून आलो म्हटल्यावर खूप अगत्याने त्यांनी स्वागत केले. अहिल्या राणी महानाट्यातील मुख्य नायिकाही यावेळी उपस्थित होत्या. खरोखर आजचा दिवस व महाराणी साहेबांना वंदनाचा क्षण सदभाग्याचा, अविस्मरणीय असा ठरला. Kiran Agrawal #KiranAgrawal #IndoreTour

No comments:

Post a Comment