Thursday, August 6, 2026

LAA 2026

20 April, 2026 #LokmatAchieversAwards ... LAA 2026
कामाचा व्याप हा टाळता येणारा नसतो, मात्र त्यातही निवांतता शोधून दोन घटका आनंदात घालवण्याची व नव्या संकल्पना घेऊन नव्या ऊर्जेने पुढील प्रवासासाठी सिद्ध होण्याची संधी जेव्हा व्यवस्थापनाकडूनच दिली जाते तेव्हा त्याचा आनंद काही औरच असतो. 'लोकमत'कडून दिल्या जाणाऱ्या अशा संधीचा सोहळा म्हणजे... LAA. पुणे, नाशिक, गोवा व मुंबई नंतर यंदा या सोहळ्याच्या चौदाव्या आवर्तनाचे यजमानपद छत्रपती संभाजी नगरच्या टीमला लाभले. मंगलम रिसॉर्ट येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. देशभरातील लोकमत समूहातील लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाइम्स या तीनही भाषेतील वृत्तपत्रांचे तसेच डिजिटल लोकमत, ऑनलाइन लोकमत, लोकमत चॅनेल अशा सर्व प्लॅटफॉर्मवरील सुमारे 400पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या उर्जादायी सोहळ्यात सहभागी होत परस्परातील पारिवारिक स्नेहाचे संबंध दृढ केले.
समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार डॉ. विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण, अर्थ व उद्योगमंत्री श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्या मार्गदर्शनाने नवी ऊर्जा लाभली. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक श्री देवेंद्रबाबूजी, सह व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक श्री ऋषीबाबूजी, कार्यकारी तथा संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्या चर्चेतून नवीन आव्हाने व संकल्पाची उकल झाली. लोकमत मॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, अशोकबाबूजी जैन, समूह संपादक विजय बाविस्कर सर यांच्यासह व्यवस्थापनातील सर्व मान्यवरांचा सहवास व मार्गदर्शन यावेळी लाभले. याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे... #LAA2026 #LAACSN #LAA #KiranAgrawalLokmatJalgaon #LokmatJalgaon #LokmatEvent

No comments:

Post a Comment