Wednesday, August 5, 2026

ानगळ ते पालवी

19 March, 2026 ानगळ ते पालवी
चैत्राची पालवी ही सृष्टीच्या सृजनाचा संकेत देणारी असते. आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवा हर्ष, नवे वर्ष म्हणतो; त्यातील हर्ष हा या सृजनातून आकारास आलेला असतो. अर्थातच, नवी पालवी अंकुरण्याआधी पानगळ ठरलेली असते. निसर्गाच्या सांधे बदलाची ती एक पायरीच म्हणता यावी. जुने जाते, नवे येते... पानगळ ते पालवी असा हा निसर्गाचा सृजनोत्सव. लालबुंद लालीतून होणारा हिरव्यागर्द अंकुराचा प्रवास. हाच सृष्टीचा सृजनोत्सव. चैत्र पालवीचा उत्सव! या उत्सवातील पानगळ ते पालवीच्या प्रवासाचे टप्पे दर्शविणारी ही छायाचित्रे.. सहज चैत्रोत्सवानिमित्त. निसर्ग अंकुरतोय, तसे जुनी मरगळ झटकून आपणही नव्या उमेदीने व उत्साहाने जगण्याच्या उत्सवासाठी सज्ज होऊया... गुढी पाडवा, नववर्षाच्या शुभेच्छासह... Kiran Agrawal

No comments:

Post a Comment