Thursday, August 6, 2026

लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 ... Jalgaon

05 June 2026 लोकमत सरपंच अवॉर्ड्स 2026 ...
ग्रामविकासाचे सारथ्य करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सरपंचांचा 'लोकमत'तर्फे सन्मान करण्यात आला. जळगावच्या सुदर्शन बँक्वेट हॉल येथे झालेल्या या शानदार समारंभास फैजपूरच्या सतपंथ आश्रमाचे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, पद्मश्री चैत्राम पवार, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. बीकेटी प्रेझेंट्स या लोकमत सरपंच अवॉर्ड्सना संतूर, टाटा पॉवर सोलर रुफ, आयटेल व एमपी बिर्ला सिमेंटचे परफेक्ट प्लसचे सहकार्य लाभले. #LokmatJalgaon #LokmatSarpanchAwards #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment