Thursday, August 6, 2026

ाडळसरे निम्न तापी प्रकल्पाला भेट

07 July, 2026 ाडळसरे निम्न तापी प्रकल्पाला भेट
अमळनेरनजिक तापी नदीवर बांधण्यात येत असलेल्या पाडळसरे निम्न तापी प्रकल्पाला भेट देऊन सुरू असलेले काम बघितले. जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या सिंचनाला या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. खूप विस्तीर्ण पात्र असून, 24 गेट असलेला प्रकल्प साकारतो आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींचा सततचा पाठपुरावा व मा. अजितदादा पवार असताना त्यांनी लक्ष घातल्याने या प्रकल्पाला गती मिळाली. केंद्रानेही मोठा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे बऱ्यापैकी काम पुढे गेले आहे. नेहमी या प्रकल्पासंबंधीत बातम्या येतात. त्यामुळे साइटवर नेमके काय चालू आहे हे प्रत्यक्ष बघण्याची इच्छा होती. अमळनेर दौऱ्याच्या निमित्ताने ते बघता आले. #PadalsareProject #KiranAgrawalLokmatJalgaon

Saraunsh in Jalgaon Lokmat on 05 July, 2026

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260705_2_11&fbclid=IwY2xjawThRrNwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEewoJNT_xiwSXTCYwVuR5rKlOY5grvxHaEaxn1_Bn0d2d1CCcg3saQlDgD5iQ_aem_svoPtgownsCVRKQOI2ImnQ

Dr. Dhole visit 2026

04 July, 2026
आपल्या नेहमीच्या कामकाज क्षेत्रापलीकडील व्यक्तींच्या भेटी या खूप काही शिकवून तर जातातच, शिवाय त्यातून नवे मित्र जोडल्याचा आनंदही लाभून जातो. प्रसिद्ध विज्ञान कथा लेखक व भौतिकशास्त्रज्ञ, प्रोफेसर डॉ. संजय ढोले यांच्याशी झालेली भेट ही त्यापैकीच एक. जळगाव येथील विद्यापीठाच्या कामानिमित्त आलेले डॉ. ढोले हे लोकमतचे विज्ञान कथा लेखक म्हणून असलेली नाळ जपत खास भेटीसाठी आले. पुणे येथील ज्ञान प्रसार ग्लोबल विद्यापीठात संचालकपदी कार्यरत असलेले डॉ ढोले यांच्या 14 विज्ञानकथा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून सुमारे चारशेच्या आसपास संशोधन निबंध विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाले आहेत. तसे ते मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील. अमळनेरमध्येही शिक्षण झालेले, त्यामुळे इकडची ओढ व भावनिकता पदोपदी जाणवत होती. सध्याची एकूणच शैक्षणिक व्यवस्था व त्यातील आव्हाने याविषयी त्यांच्याशी खूप छान चर्चा झाली. जळगाव येथील डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्रा. डॉ. रवींद्र बावने यांच्यामुळे हा योग घडून आला. #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

रक्तदान शिबिराद्वारे आदरांजली...

02 July, 2026 रक्तदान शिबिराद्वारे आदरांजली...
लोकमतचे संस्थापक संपादक, स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांच्या 103व्या जयंतीनिमित्त लोकमत व रेडक्रॉस यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करून बाबूजींना आदरांजली.. जळगावच्या महापौर सौ दीपमाला काळे, रेडक्रॉस चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव सुभाष साखला, राजकुमार वाणी, डॉ. उल्हास तासखेडकर, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदि याप्रसंगी समवेत होते #LokmatJalgaon #Babuji #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

लोकमत Icons of Nandurbar 2026 ...

26 June, 2026 लोकमत Icons of Nandurbar 2026 ...
नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून इतरांपुढे आदर्श ठेवणाऱ्या मान्यवरांचा लोकमत माध्यम समूहातर्फे 'आयकॉन्स ऑफ नंदुरबार' म्हणून गौरव करण्यात आला. लोकमतचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी जवाहरलालजी दर्डा तथा श्रद्धेय बाबूजी यांनी समाजातील चुकीच्या बाबींवर प्रहार करताना चांगल्याचे कौतुक करण्याचा संस्कार आम्हाला दिला. लोकमत माध्यम समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्यासह सर्व संचालकांनी पत्रकारिता परमो धर्माच्या जाणिवा खोलवर रुजवत समाजातील सकारात्मकता व आदर्शांच्या पाठीशी बळ उभे करण्याची शिकवण दिली. त्यातूनच सरपंच ते संसद सदस्यांपर्यंतचे सन्मान सोहळे व ठिकठिकाणचे आयकॉन्स शोधून त्यांच्या गौरवाचे कार्यक्रम घेतले जात असतात.
नंदुरबारमधील अशाच आयकॉन्सच्या गौरव सोहळ्यास केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव राजेंद्र गावित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवर व उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदीं समवेतची ही काही आठवण चित्रे... Kiran Agrawal #किरणअग्रवाल #LokmatJalgaon #LokmatNandurbar #IconsOfNandurbar #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

Saraunsh in Jalgaon Lokmat on 28 June, 2026

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20260628_2_1&fbclid=IwY2xjawThQMJwZG9mAWV4dG4DYWVtAjEwAGJyaWQRMVFiYkxLcklyeTFiNnV3dEdzcnRjBmFwcF9pZBAyMjIwMzkxNzg4MjAwODkyAAEewoJNT_xiwSXTCYwVuR5rKlOY5grvxHaEaxn1_Bn0d2d1CCcg3saQlDgD5iQ_aem_svoPtgownsCVRKQOI2ImnQ

Yoga Day 2026

21 June, 2026 तन व मनाच्या सुदृढतेसाठी योगा...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज लोकमत सखी व श्री श्री रविशंकर जी प्रणित द आर्ट ऑफ लिव्हिंग महाराष्ट्र, श्री श्री स्कूल ऑफ योगाच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी योगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वी दि.15 ते 20 जूनपर्यंत प्रतिदिनी 3 सेशनमध्ये लोकमत व 'आर्ट ऑफ लिव्हिंग'तर्फे ऑनलाइन योगा शिबिर घेण्यात आले, यात देश विदेशातील लाखो लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. तन व मनाच्या सुदृढतेबरोबरच आरोग्यपूर्ण जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे योगा असल्याने विविध शहरांमध्ये असंख्य बंधू-भगिनींनी या योगोत्सवात सहभाग घेतला. जळगावमध्ये या योगात्सवाचा शुभारंभ संत बाबा हरिदासराम समाज मंदिर येथे झाला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, योगा ट्रेनर डॉ. रंजना बोरसे, भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शहरातील सिविल हॉस्पिटल, ला. ना. हायस्कूल, नूतन मराठा महाविद्यालय, डॉ अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, रोझ गार्डन या ठिकाणच्या योगोत्सव कार्यक्रमाला उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांच्यासमवेत सदिच्छा भेटी दिल्या. याप्रसंगीची काही छायाचित्रे... Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #LokmatYoga #KiranAgrawalLokmatJalgaon