Thursday, November 13, 2025

जयगावमा गैरी थंडी ...

11 Nov 2025 जयगावमा गैरी थंडी वाजी राह्यनी ना भो!
राज्यातील सर्वात कमी, म्हणजे महाबळेश्वर पेक्षाही कमी 10अंश सेल्सिअसच्या जवळपास तापमान येथे आहे... Kiran Agrawal #GoodMorningJalgaon #LoveYouJalgaon

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 09 Nov, 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251109_4_1&fbclid=IwY2xjawOCi9RleHRuA2FlbQIxMABicmlkETFOUnJFaHgyczU3NVBTeHRpc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHt7MaIKFLoPxqcyp4-FR5YkQecA_4iy3iJsioQ3UPL7ea6qOnQiMklowCT-d_aem_LvS7mhpZmpBb8DNDQy5dXg

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 02 Nov, 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251102_2_2&fbclid=IwY2xjawOCizJleHRuA2FlbQIxMABicmlkETFOUnJFaHgyczU3NVBTeHRpc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHp8ePjcDvmWZPRrUtaCNmSn_9oKq-kcWrvTnSDIHxMuEdgg84CUf1CNblEsA_aem_gc1iQj-2wZvSfcKrYpyNyA

Saraunsh published in Jalgaon Lokmat on 26 Oct, 2025

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_JLLK_20251026_2_1&fbclid=IwY2xjawOCijlleHRuA2FlbQIxMABicmlkETFOUnJFaHgyczU3NVBTeHRpc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHvxh8LAeKuvbGsGq9drf2d3kCltFdW8D_qQXLa67BPTi23l6lrPSmWfrOENr_aem_31Jl4ZapnJns8HzCszySgA

आनंदाचे डोही आनंद तरंग...

22 Oct, 2025 आनंदाचे डोही आनंद तरंग...
दिवाळीच्या प्रकाश पर्वात सारे वातावरण सप्तरंगात न्हाऊन निघाले आहे. सर्वत्र आनंदाची व मांगल्याची बरसात होते आहे. लख्ख उजेड उधळणाऱ्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला आहे... घरात लक्ष्मीपूजन आटोपल्यावर लगतचे मित्र व ज्येष्ठांच्या भेटी व त्यांचे आशीर्वाद घेऊन गच्चीवर गेलो, आकाशात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे होणारा रंगोत्सव बघायला... **** पाठोपाठ धाकटी कन्या कृतिका सोबत सौ.ही आली. काहीशी शांत, निवांत होती. विचारले, एवढा उत्साहाचा हा उत्सव; तुला काय झाले? म्हटली, आज श्रुती येथे नाही... लग्नानंतरची तिची पहिली दिवाळी. तिच्या सासरी ती आहे. मनात कालवाकालव जरूर झाली, कारण गेल्या 28 वर्षात फक्त एकदाच, ती नोकरीला लागल्याच्या पहिल्या वर्षी सुटी न मिळाल्याने पुण्यात अडकली होती; म्हणून दिवाळीला सोबत नव्हती. तेवढा अपवाद वगळता कायम ती सोबत असे. पण आता तर यापुढे असेच होणार. लग्न झालेय तिचे. म्हटले, अरे आपल्या पणतीने आपण तिच्या सासरचे अंगण उजळले; हा किती मोठा आनंद! नाते संबंधाची नवी चादर शिवून मायेची मधुर उब तिला लाभलीय.. आयुष्याचा सहचर आणि आणखी एका मम्मी पप्पांच्या, दिदीच्या सहवासाने तिच आयुष्यच सुगंधी झालंय... आमच्या या दिवाळीलाही लाभलाय तिचा तो सुगंधी दरवळ. ****
हे खरं, की ती असायची तर.., असू द्या, खूप आठवणी आहेत. जागा नाही पुरणार लिहायला. वेळ नाही तितका... आमच्या वेलीवर आलेली ती एक चिमणी, भुर्रकन उडून गेली नव्या कुटुंब कबिल्यात. लेकीचं असंच असतं, इतका जीव लावलेला असतो त्यांनी आपल्याला.. कधी आईसारखा, कधी बहिणीसारखा, प्रसंगी मैत्रिणीसारखा; की त्यांचं घरातलं असणं एखाद्या अत्तरासारखं बनून जातं. सासरीच काय, लग्नापूर्वी ती नोकरीसाठी म्हणून घर सोडून पुण्यात गेली होती तर घर कसं रीतं रित वाटे आताच्या या रितेपणात मात्र एक भरलेपण आहे, कारण पंखात बळ आलेली चिमण पाखरं आपला खोपा विणतातच ना.. तिलाही लाभला असाच खोपा अन एक जोडीदार चिमणा. कसं असतं ना आयुष्य, बदलते प्रसंग आणि परिस्थितीच्या हिंदोळ्यावर झुलणारं.. त्यातच तर आहेत भाव भावनांचे सप्तरंग अन आठवणींचे कल्लोळ ****
आकाशातही फटाक्यांचा कल्लोळ उठला आहे, रंग उधळले जात आहेत, पण या गजबजाटात आम्ही कुठे तरी हरवून बसलो होतो स्वतःला. एवढ्यात व्हिडिओ कॉलची बेल वाजली... कॉल एक्सेप्ट करताच एका सुरात नाद गुंजला... हॅप्पी दिवाली ! श्रुती, जावई तुषार, चंचल, व्याही - विहिण बाई सारे कुटुंब स्क्रीनवर होते... त्यांच्याकडे यंदा साक्षात लक्ष्मी आल्याचा भाव आणि आनंद त्यांच्या बोलण्यात ओसंडून वाहताना दिसला. सारे घर आनंदात न्हाऊन निघालेले... आणखी काय हवे, कुणाही लेकीच्या बापाला आणि कुटुंबाला? त्या आनंदाच्या प्रकाश प्रवाहात आम्हीही डुंबतो, वाहतो आहोत आता... #KiranAgrawal #HappyDipawli #ShruTu.

लोकमत दिवाळी पहाट 2025 ...

20 Oct, 2025 लोकमत दिवाळी पहाट ...
मांगल्याच्या पर्वातील सुर संगीताला जेव्हा भाव भक्तीचे कोंदण लाभते तेव्हा आनंदाची टाळी लागल्याशिवाय राहत नाही. जळगावमधील श्री ओंकारेश्वर मंदिराच्या प्रांगणात लोकमत सखी आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात तेच झाले. वाचक रसिकांचे कानसेन असे काही तृप्त जाहले की सूर्य माथ्यावर येईपर्यंत कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, प्रायोजक सातपुडा ऑटोमोबाईल्सचे किरण बच्छाव, वेदांती बच्छाव, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचे जुगल जोशी, डॉ. गौरव महाजन, डॉ. प्राची महाजन, डॉ. अमित भंगाळे, गणपती ऍडचे ज्ञानेश्वर पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाशिकच्या संगीतराज ग्रुपच्या संगीता भावसार व जिशान या गायकांनी गायीलेल्या सुमधुर गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. पारंपरिक नऊवारीचा साज लेऊन भल्या पहाटे या कार्यक्रमास लोकमत सखी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. Kiran Agrawal
#LokmatDiwaliPahat #LokmatJalgaonEvent #LokmatSakhi #KiranAgrawalLokmatJalgaon

'लोकमत'मधील दिवाळी 2025 ...

18 Oct 2025 'लोकमत'मधील दिवाळी...
आमच्या लोकमत परिवारासोबतच्या दिवाळीचे हे छायाचित्र. कार्यालयीन कामाच्या व्यतिरिक्त परस्परांमधील भावबंध जपणारा कुटुंब कबिला. आमचे बाबूजी, स्वतंत्रता सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांनी ही परिवाराची भावना रुजवली आणि चेअरमन आदरणीय डॉ विजयबाबूजी दर्डा व एडिटर इन चीफ आदरणीय श्री राजेंद्रबाबूजी दर्डा यांच्यासह पुढील पिढीनेही ती तितक्याच आपुलकीने व स्नेहाने जपली. लोकमत भवन जळगावच्या हिरवळीवर कार्यालयीन सहकारींसमवेत झालेला दिवाळीचा स्नेह सोहळा हा त्याचाच एक भाग... #LokmatJalgaon #LokmatDiwali #LokmatJalgaonEvent