Thursday, November 13, 2025

लोकमत चाळीसगाव कार्यालयाचा वर्धापनदिन 2025 ...

13 Sept, 2025 लोकमत चाळीसगाव कार्यालयाचा वर्धापनदिन ...
लोकमतच्या चाळीसगाव विभागीय कार्यालयाचा 22वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त अनेक स्नेहींची भेट झाली. चाळीसगाव, पाचोरा व भडगाव तालुक्यातील वाचकांच्या अपूर्व स्नेहाच्या पाठबळावर लोकमतची यशोदायी वाटचाल राहिली आहे आणि ती उत्तरोत्तर वर्धिष्णू होत आहे. यावेळी वर्धापन दिनानिमित्त विशेष पुरवणीचे प्रकाशन व विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, चाळीसगावचे माजी आमदार प्रा. साहेबराव घोडे, राजीवदादा देशमुख, ज्येष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, उद्योजक सुशीलभाऊ अग्रवाल, चाळीसगाव कॉलेजचे चेअरमन सुरेश स्वार, स्वयंदीप दिव्यांग महिला मंडळाच्या प्रमुख मीनाक्षी निकम, उद्योजक हरीश पल्लण, पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, लोकमतमधील सहकारी उपमहाव्यवस्थापक गौरव रस्तोगी व्यासपीठावर समवेत होते.
#LokmatJalgaon #LokmatChalisgaon #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment