Thursday, November 13, 2025

यंग @60 ... साठीतल्या क्रियाशीलतेला सलाम

19 Sept 2025 यंग @60 ... साठीतल्या क्रियाशीलतेला सलाम
नियत वयोमानानंतरही आपापल्या क्षेत्रात समर्पित भावनेने योगदान देणाऱ्या जळगाव शहरातील प्रातिनिधक मान्यवर भगिनींचा लोकमत सखीच्या रौप्य महोत्सवानिमित्ताने गौरव करण्यात आला. लोकमत सखीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्यात ठिकठिकाणी ‘यंग @60’चे आयोजन करण्यात आले. जळगावमधील हॉटेल रॉयल पॅलेस येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास खासदार स्मिता वाघ, विधानपरिषदेच्या माजी आमदार मधू जैन, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या इंदिराताई पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, आर.सी. बाफना ज्वेलर्सच्या संचालिका नयनतारा बाफना आदी मान्यवर उपस्थित होते. **** शोभा पाटील, शैलजा निकम, उषा शर्मा, उषाबाई छाजेड, मंगला बारी, राजकमल पाटील, सुधा काबरा, डॉ. रजनी नारखेडे, अ‍ॅड. कालिंदी चौधरी, डॉ. ज्योती कडुसकर, डॉ. रेखा महाजन, लता सराफ, डॉ. सुमन लोढा, नीलिमा सेठीया, निर्मला पाटील या भगिनींचा यावेळी गौरव करण्यात आला.
#LokmatJalgaon #Young@60 #LokmatSakhi #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment