Wednesday, November 12, 2025

नंदुरबारमध्ये 'लोकमत'चा वर्धापन दिन 2025 ...

25 July 2025 नंदुरबारमध्ये 'लोकमत'चा वर्धापन दिन...
लोकमतच्या नंदुरबार विभागीय कार्यालयाचा 28वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या आदिवासी जिल्ह्याच्या विकासासाठी व येथील समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमतने सुरुवातीपासून चालविलेल्या प्रयत्नांबद्दल यावेळी विविध मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. **** राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, माजी मंत्री ऍड के सी पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावनकुमार, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयपाल रावल, शहादा बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड राम रघुवंशी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. ****
युनिट हेड गौरव रस्तोगी व ऍड मार्केटिंगचे मुख्य व्यवस्थापक सुरजकुमार धाये, वितरणचे सहा. महा व्यवस्थापक राजेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार लोकमतचे हॅलो हेड रमाकांत पाटील, सहकारी मनोज शेलार, भूषण रामराजे, दिनेश सावळे व जिल्ह्यातील रमेशकुमार भाट, गुलाबसींग गिरासे, हिरालाल रोकडे, वसंत मराठे आदी वार्ताहर बंधूंनी या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले. #LokmatNandurbar #LokmatJalgaon #kiranagrawallokmatjalgaon

No comments:

Post a Comment