Wednesday, November 12, 2025

धन्यवाद धुळेकर 2025 ...

26 August 2025 धन्यवाद धुळेकर ...
पांझरेच्या काठी वसलेल्या धुळे येथील 'लोकमत' विभागीय कार्यालयाचा 41वा वर्धापनदिन प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी हजेरी लावत शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाणे, आमदार काशिनाथ पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, राष्ट्रवादीचे नेते सुरेश सोनवणे, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरवणीचे प्रकाशन व जिल्ह्यातील कार्य कर्तृत्ववानांचा गौरवही करण्यात आला. धुळ्याचे हॅलो हेड राजेंद्र शर्मा व जिल्ह्यातील सर्व वार्ताहरांच्या टीमने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 'लोकमत'ला लाभलेले वाचकप्रियतेचे पाठबळ व स्नेहाबद्दल धुळेकरांचे धन्यवाद. Kiran Agrawal
#LokmatJalgaon #LokmatDhule #HelloDhule #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment