Wednesday, November 12, 2025

लोकमत कॅम्पस क्लबची पंचविशी...

04 July 2025 लोकमत कॅम्पस क्लबची पंचविशी...
लोकमतच्या वाचक परिवारातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत बाल वाचकांकरीता लोकमतचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक व संपादकीय संचालक ऋषीबाबूजी दर्डा यांनी कॅम्पस क्लबचा प्रारंभ केला. या क्लबचे हे रौप्य महोत्सवी वर्ष. या वाटचालीत बाल वाचकांसाठी विविध शैक्षणिक, मनोरंजनात्मक, क्रीडा व ज्ञानवर्धक उपक्रम आयोजित करताना त्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न लोकमत कॅम्पस क्लबद्वारे केले जात आहेत. याच मालिकेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी AIचा कसा उपयोग होऊ शकतो याचे मार्गदर्शन करण्यासाठी खास 'प्रिन्सिपल्स मिट' घेण्यात आली. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणक शास्त्र प्रशाळेचे प्रा. डॉ. अजय पाटील यांनी यात मार्गदर्शन केले. यावेळी लोकमत कॅम्पस क्लबच्या रौप्यमहोत्सवी लोगोचे अनावरणही करण्यात आले. #LokmatJalgaon #LokmatCampusClub #PrincipalsMeet #LokmatJalgaonEvent #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment