Wednesday, November 12, 2025

#LAA2025 मध्ये लयलूट ..

29 April 2025 #LAA2025 मध्ये लयलूट ..
लोकमत समूहात उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव सोहळा Lokmat Achievers Awards यंदा कुंभ नगरी नाशिकच्या ताज गेटवे मध्ये सोत्साह पार पडला. कार्यकारी व संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या सोहळ्याची यंदा ही 13वी आवृत्ती प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय उत्साहात पार पडली व ऊर्जादायी ठरली. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्रबाबूजी दर्डा व करणबाबूजी यांचे यावेळी लाभलेले मार्गदर्शन नवी दिशा देणारे ठरले.
यंदा जळगाव आवृत्तीने सहा पुरस्कार मिळवत अवॉर्डसची लयलूट केली. नाशिक व अकोला येथे संपादकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जे यश लाभले त्याचीच पुनरावृत्ती जळगावमध्ये घडून आली याचा विशेष आनंद आहे. जळगाव संपादकीय विभागाने यात ऐतिहासिक नोंद करीत तब्बल पाच पुरस्कार मिळवले. जळगावची टीम बेस्ट स्टार एडिशन पुरस्काराची मानकरी ठरली. यासोबतच बेस्ट हॅलोचा सन्मान रमाकांत पाटील यांच्या नेतृत्वातील नंदुरबारला लाभला. मोस्ट इम्पॅक्टफुल स्टोरी कुंदन पाटील यांना तर बेस्ट स्टार रिपोर्टर विजय कुमार सैतवाल ठरले. बेस्ट स्टार डेस्क रिपोर्टर हा पुरस्कार नंदुरबार येथील भूषण रामराजे यांना मिळाला. यासोबतच बेस्ट इव्हेंट टीमचा पुरस्कार राहुल अहिरे यांना मिळाला. यांना यात अवॉर्डस लाभलेत. Proud of my Team Jalgaon ... #LAANashik #LokmatJalgaon #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment