Wednesday, November 12, 2025

परिवर्तनकारी व्यक्तिमत्वाशी भेट... Shantilalji Mutha

10 Apil 2025 परिवर्तनकारी व्यक्तिमत्वाशी भेट...
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यापेक्षाही मोठी ओळख, नव्हे कर्तृत्व म्हणजे जलसंधारणाचे महत्त्व जाणून 'गाळयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून शासनाच्या सहकार्याने संपूर्ण राज्यात प्रभावी लोक चळवळ उभी केलेले व्यक्तिमत्व आणि केवळ तितकेच नव्हे, तर त्यापुढे जाऊन आता मूल्य शिक्षणासाठी संपूर्ण राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम लागू करण्यासाठी परिश्रम घेत असलेले खरे परिवर्तनकारी व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रख्यात समाजसेवी शांतीलालजी मुथा. भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवाच्या मुख्य समारोहासाठी प्रमुख अतिथी म्हणून जळगावमध्ये आलेल्या शांतीभाऊ मुथा यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भाऊंसमवेतच्या सामाजिक कार्याला यावेळी उजाळा देता आला. बदलता काळ व त्या अनुरूपची आव्हाने लक्षात घेता पुढे येणाऱ्या सामाजिक समस्यांपासून सुटका व्हायची असेल तर बाल वयातच मूल्य शिक्षण रुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांपासून विविध सामाजिक सुधारणांचा पट अतिशय अभ्यासपूर्णपणे व भावनाशीलतेने उलगडणाऱ्या शांतीभाऊंसोबतच्या गप्पांमधून सामाजिक रुणाचे बंध अधिक गहिरे होण्यास मदत झाली. भाऊंसोबत जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनय पारख, जलदूत अभियानाचे तालुकाध्यक्ष पंकज जैन, कार्यकारणी सदस्य उदय कर्नावट, हितेश संकलेचा तसेच किशोर भावसार आदि उपस्थित होते. #LokmatJalgaon #BJS #ShantilalMutha #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment