Thursday, November 13, 2025

लोकमत अमळनेर कार्यालयाचा वर्धापन दिन 2025 ..

18 Sept, 2025 लोकमत अमळनेर कार्यालयाचा वर्धापन दिन..
स्वातंत्र्यासोबतच शैक्षणिक, वैचारिक व कामगार क्षेत्रात क्रांती घडविणारा तालुका व परिसर अशी ओळख असलेल्या अमळनेरच्या लोकमत कार्यालयाचा १८वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देणारी पुरवणी प्रकाशित करतांनाच संबंधितांना 'गौरव कर्तृत्वाचा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार डॉ. बी एस पाटील, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, चोपड्याच्या लढाऊ महिला नेत्या इंदिराताई पाटील, भाजपा युवा नेत्या भैरवी पलांडे वाघ, डॉ.संदीप जोशी, आशिष गुजराथी, लोकमतचे उप महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी आदी उपस्थित होते. अमळनेर, चोपडा व पारोळा तालुक्यातील वाचकांच्या स्नेहाचा हा सोहळा होता. त्यांचे यावेळी भरभरून आशीर्वाद लाभले...
#LokmatJalgaon #LokmatAmalner #LokmatAnniversary #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment