Wednesday, November 12, 2025

लोकमत सखींचा श्रावण सोहळा : 2025

09 August 2025 लोकमत सखींचा श्रावण सोहळा : 2025
लोकमत सखींचा श्रावण सोहळा म्हणजे उत्साहाचा, चैतन्याचा झरझर झराच असतो. जळगावमध्ये आयोजित या वर्षाच्या सोहळ्यातही भगिनींचा तसाच आनंद ओसंडून वाहिला. विशेष म्हणजे निसर्गाचा हा सृजनसोहळा व व्रत वैकल्यांचा महिना असणाऱ्या श्रावणाचा आनंद घेताना मराठी परंपरेच्या मंगळागौर व गौराई महाराष्ट्राची, श्रावण क्वीन स्पर्धा आयोजित करून संस्कृती, संस्काराला जपण्याचा प्रयत्न केला गेला. सखी संस्थापिका ज्योत्स्ना भाभीजी दर्डा यांनी याचसाठी या मंचचे रोपटे लावले, महिला भगिनींना आकाश कवेत घेण्याची संधी या मंचच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. आज 'लोकमत सखी'चा वटवृक्ष झाला आहे. प्रख्यात अँकर, स्टार प्रवाहचे सदस्य आदेश बांदेकर व प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी यावेळी उपस्थित सखींशी संवाद साधून सोहळ्यात रंग भरले. याप्रसंगीची काही श्रावण चित्रे.. Kiran Agrawal #LokmatJalgaon #LokmatJalgaonEvent #LokmatSakhiJalgaon #LokmatShrawanSohala #KiranAgrawalLokmatJalgaon

No comments:

Post a Comment