At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Wednesday, May 3, 2023
गुणवंतांच्या सन्मानाचा गौरवशाली सोहळा...
April 26, 2023
गुणवंतांच्या सन्मानाचा गौरवशाली सोहळा...
महाराष्ट्रातील गुणवंतांचा गौरव सोहळा म्हणजे लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्डस सोहळा.
मुंबईच्या वरळीतील NSCI डोम येथे यंदाचा हा कार्यक्रम होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया आदी मान्यवर या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
लोकमतचे सहव्यवस्थापकीय तथा संपादकीय संचालक, युवा नेतृत्व श्री ऋषी दर्डा यांच्या कल्पकतेतून या अवॉर्डची संकल्पना पुढे आली आणि आज ती राज्यातील गुणवंतांच्या गौरवाचा ब्रँड बनली आहे.
या सोहळ्यासाठी समूह संपादक श्री विजय बाविस्कर सर यांच्यासह चक्रधर दळवी, नंदकिशोर पाटील (औरंगाबाद), किरण अग्रवाल (अकोला), रवी टाले (जळगाव), मिलिंद कुलकर्णी (नाशिक), धर्मराज हल्ल्याळे (लातूर), गजानन चोपडे (अमरावती), राजेश निस्ताने (नांदेड), यदु जोशी (मुंबई) आदी संपादकीय टीम मुंबईत दाखल.
#LMOTY #LokmatMaharashtrianOfTheYear #KiranAgrawal
Tuesday, April 25, 2023
साक्षरतेच्या निकषात पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित..
April 24, 2023
साक्षरतेच्या निकषात पदवीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित..
ग्रामीण भागात पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ४.०८ टक्के आहे. म्हणजे तब्बल 95 टक्के ग्रामीण जनता पदवीपर्यंत पोहोचू शकलेली नाही, त्यामुळे शासनाने शिक्षणात साक्षरतेचा मापदंड पदवीपर्यंत मानावा, असे मत नांदेड येथील आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम व्यक्त केले.
अकोला येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता कदम यांनी लोकमत कार्यालयास सदिच्छा भेट दिली, यावेळी एकूणच शिक्षण विषयक अनास्थेबद्दल ते पोटतिडकेने बोलत होते.
आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत १८२ आयएएस, आयपीएस अधिकारी आणि २०० पेक्षा अधिक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाचे अधिकारी तयार झाले असून, प्रशासकीय अधिकारी निर्मितीचे काम मिशनच्या माध्यमातून सुरु आहे. संवेदना जाग्या असलेली, मानवी चेहऱ्याची व्यक्ती अधिकार पदाच्या खुर्चीत असली की प्रशासकीय कामे तात्काळ मार्गी लागतील या प्रामाणिक भूमिकेतून कदम यांचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हयात आंबेडकरवादी मिशनतर्फे शिक्षण परिषद घेवून शिक्षणाचे ‘आॅडीट’ केले जाणार आहे, त्यातून शिक्षण विषयक वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.
सामाजिक कार्यकर्ते पराग गवई व संपादकीय सहकारी यावेळी चर्चेत सहभागी झाले.
#LokmatAkola #KiranAgrawalLokmat
Saraunsh published in Akola Lokmat on April 23, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230423_2_4&fbclid=IwAR3yM8PQrYFYi3tAv-W7pp3pB_sBAwo2gDhYkYkVj7oY3gdZNQENd9DsPQ4
https://www.lokmat.com/editorial/resolutions-for-social-reforms-should-also-be-made-in-gram-sabha-a-a520-c719/?fbclid=IwAR28voVHMXmnceUlAK7ROXf6bs5EpTioDiGG6HLpNmndQQJMA6S1IFbB-Hw
वारसा जपूया, संस्कृती जपूया...
April 18, 2023
वारसा जपूया, संस्कृती जपूया...
विदेशात फिरताना त्या त्या ठिकाणचे ऐतिहासिक वारसे त्या त्या देशांनी जपून ठेवल्याचे व त्यातून पर्यटन वृद्धीस व अर्थकारणास हातभार लाभल्याचे प्रकर्षाने दिसून येते. आपल्याकडेही ते होते, त्यात लोकसहभाग लाभणे गरजेचे आहे.
आज #WorldHeritageDay2023 आहे.
सरकार व यंत्रणा आपले ऐतिहासिक वारसे जपण्यासाठी जे करायचे ते करेलच, पण सुजाण नागरिक म्हणून आपणही हे वारसे जपण्यासाठी कटिबद्ध होऊया...
पर्यटक म्हणून अशा ठिकाणी जाताना किमान तेथे आपल्याकडून काडी कचरा फेकला जाणार नाही याची काळजी घेऊया.
ऐतिहासिक वारशांच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती व गौरवशाली इतिहासाचेच जतन करीत असतो हे लक्षात ठेवूया...
#KiranAgrawal #WorldHeritage
Saraunsh published in Akola Lokmat on April 16, 2023
http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20230416_2_2&fbclid=IwAR20XUVmK4zEX-ICiSb-mCXYVen1rNM5Aw3ppIDdMJTbT50-9hzBJensunc
https://www.lokmat.com/editorial/over-salt-water-astringent-politics-a-a520-c310/?fbclid=IwAR36ciRB6AQnhDUNGQsGOPwc9UggA6ZEqRBG2TTWlIGVIYJQ2O3Ij4EOdis
Thursday, April 13, 2023
#LAA ... Lokmat Achiever's Awards 2023
April 13, 2023
#LAA ... Lokmat Achiever's Awards 2023
लोकमत वृत्तपत्र समूहाच्या व्यवस्थापनाकडून कौतुकाची थाप मिळवून व नव्या संकल्पना घेऊन पत्रकारिता परमो धर्म निभावण्यास पुन्हा सिद्ध होण्याची ऊर्जा देणारा सोहळा म्हणजे LAA.
पुणे, नाशिक व गोवा नंतर हा सोहळा यंदा मुंबई येथे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, या संकल्पनेचे हे अकरावे वर्ष आहे.
समूहाचे चेअरमन तथा माजी खासदार श्री विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ तथा राज्याचे माजी शिक्षण व उद्योगमंत्री श्री राजेंद्रबाबूजी दर्डा, लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक श्री देवेंद्रबाबूजी, सह व्यवस्थापकीय संचालक श्री ऋषीबाबूजी, कार्यकारी तथा संपादकीय संचालक श्री करणबाबूजी दर्डा यांच्यासह व्यवस्थापनातील सर्व मान्यवरांचा सहवास व मार्गदर्शन यावेळी लाभले.
देशभरातील लोकमत समूहातील लोकमत, लोकमत समाचार, लोकमत टाइम्स या तीनही भाषेतील वृत्तपत्रांचे तसेच डिजिटल लोकमत, ऑनलाइन लोकमत, लोकमत चॅनेल अशा सर्व प्लॅटफॉर्मवरील सुमारे 400पेक्षा अधिक मान्यवर या आनंद सोहळ्यात सहभागी झाले.
याप्रसंगीची ही काही आनंद चित्रे...
#LAA2023 #LAAMumbai #LAAThane #KiranAgrawalLokmat
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की ...
April 10, 2023
कळविण्यास अत्यंत आनंद होतो की ...
अकोला लोकमतच्या कार्यकारी संपादकपदाची सूत्रे स्वीकारून दोन वर्षेही उलटत नाही तोच येथील सर्व सहकारी बंधूंच्या मेहनतीमुळे Star Best Hello अवॉर्डचे यश हॅलो अकोलाला लाभले.
#LAA2023 .. मुंबई येथील Lokmat achievers Awards समारंभात लोकमत समूहाचे चेअरमन आद. श्री विजयबाबूजी दर्डा, एडिटर इन चीफ श्री. राजेंद्र बाबूजी दर्डा व युवा नेतृत्व श्री देवेन्द्र बाबूजी तसेच श्री ऋषी बाबूजी दर्डा यांच्या मुख्य उपस्थितीत सह व्यवस्थापकीय संचालक श्री ऋषीबाबूजी दर्डा यांच्या हस्ते हॅलो हेड श्री राजेश शेगोकार जी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
विशेष म्हणजे, श्री राजेश शेगोकार जी यांना व्यक्तिगत Most Impactful story चा, तर श्री शैलेश येंडे जी यांना Best IT & Electronics Dept. चा अवॉर्डही यावेळी लाभला. Best Editorial Edition श्रेणीतही अकोला रनर अप राहिले.
नाशिक लोकमतच्या निवासी संपादक पदाची सूत्रे घेतल्यानंतर सर्व सहकारींच्या परिश्रमामुळे अवघ्या वर्षभरात लोकमत समूहातील Best Editorial Edition अवॉर्ड लाभला होता, त्यानंतर अकोल्यातही तशाच यशाची पुनरावृत्ती झाली.
अत्यंत आनंद व अभिमानाचा हा क्षण आहे.
Very proud of you Team Akola..
My Lokmat, Jai Lokmat
#LAAThane #LokmatAkola #HelloAkola #KiranAgrawalLokmat
Subscribe to:
Posts (Atom)




















