Saturday, January 27, 2024

लोकमत विदर्भ टॅलेंट सर्च एक्झाम ...

लोकमत विदर्भ टॅलेंट सर्च एक्झाम ...
लोकमत कॅम्पस क्लब व फिटजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच विदर्भ टॅलेंट सर्च एक्झाम घेण्यात आली. यात अकोला जिल्ह्यातील अकरा शाळांमधील 4000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. फिटजी नागपूर सेंटरचे सीनियर मॅनेजर निशिकांत ओझा व विविध विभागांचे प्रमुख विनीत चौधरी, मानवींद्र वर्मा तसेच लोकमत मार्केटिंगचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश पांडेय यांच्या उपस्थितीत या परीक्षेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी #KiranAgrawal #LokmatAkola #Feetjee

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...

Jan. 26, 2024 प्रजासत्ताक दिन चिरायू होवो...
लोकमत भवन अकोला कार्यालयातील ध्वजारोहण प्राप्ती विभागाचे व्यवस्थापक श्री वासुदेव तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी... #KiranAgrawal #LokmatAkola

गो-पालन व तृष्णा तृप्तीचे शिल्प..

Jan 22, 2024 गो-पालन व तृष्णा तृप्तीचे शिल्प..
गोरक्षण संस्थानला लागून गोरक्षण रोडवर साकारलेल्या गोमुख शिल्प व कारंजाचे लोकार्पण करण्याचा मान संस्थेचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया यांच्यामुळे लाभला. प्रख्यात कलाप्रेमी सतीशजी पिंपळे यांच्या कल्पकतेतून सुमारे तीन महिन्यांच्या परिश्रमातून हे शिल्प साकारले असून, गोकुळातील श्रीकृष्णाचे गोपालन व तृष्णा तृप्तीची सेवा याचा सुरेख मेळ यात साधण्यात आला आहे. 1868पासून गोधन सेवेत कार्यरत गोरक्षण संस्थेतर्फे गोमातांचे रक्षण, पालन, पोषण, सेवा, चिकित्सा व उपचार अशा विविध पातळ्यांवर कार्य केले जात असून, दूध व खिचडी वाटपासारखे अन्य सेवा कार्यही अव्याहत सुरू आहे. गोरक्षण रोडवरून जातांना क्षणभर थांबुन न्याहाळावे, असे हे शिल्प आहे. Thanks to Shri. Deepakkumarji Bhartiya ...
#kiranAgrawal #GorakshanAkola

कण कण मे है राम...

Jan. 22, 2024 कण कण मे है राम...
राम हे फक्त नाव नाही, तर ती शौर्य, स्नेह, मर्यादा, उत्तमोत्तम, आत्मविश्वासाची अनुभूती, प्रेरणा, ऊर्जा आहे. आयोध्या नगरीत प्रभू श्रीराम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या आजच्या ऐतिहासिक दिनी संपूर्ण भारतभर जणू दिवाळी साजरी होत आहे. अवघा देश राम रंगी रंगला आहे. कणकण मे है राम.. ची प्रचिती यातून येत आहे. याचनिमित्त अकोल्यातील प्रख्यात व 155 वर्षांची परंपरा असलेल्या पुरातन श्री गोरक्षण संस्थेत प्रभू श्रीराम पूजनाचे सौभाग्य लाभले. प्रख्यात कथावाचक, आचार्य प. पु. डोंगरे महाराज स्थापित श्री व्यंकटेश्वराची आरती, गोपूजन केले. तुलादानाने गोखाद्य दिले गेले. यानिमित्त या परिसरात वावरताना एका वेगळ्याच अनामिक ऊर्जेची अनुभूती लाभली. योगायोग असा की, अकोल्यातील प्रख्यात समाजसेवी, दानशूर स्व. चिमनलालजी भरतिया व काळूरामजी रुहाटीया यांच्यासोबत युवावस्थेत काम करण्याची संधी मला लाभली होती. या दानशूरांच्या दातृत्वाच्या खुणा अकोल्यात ठायीठायी दिसतात. त्यांचीच पुढची पिढी गोरक्षण संस्थेची धुरा वाहत असून त्यांनी आज आठवणीने बोलावून हा सन्मान दिला.
गोरक्षणचे अध्यक्ष श्री दीपककुमारजी भरतिया, उपाध्यक्ष श्री महेशकुमारजी खंडेलवाल, सचिव श्री विजयकुमारजी जानी, विश्वस्त श्री श्रीप्रकाशजी रूहाटिया, श्री अंकुशजी भरतिया, सुदीपजी नैवेटिया, व्यवस्थापक मनीष विश्वकर्मा, समाजसेवी पुरुषोत्तम शिंदे, अमोल कडू,प्रवीण राउत,नितिन मोडक, प्रवीण काले, गजेंद्र कानकिरड़, जयेश अग्रवाल, मयूरजी सिंघानिया, गोविंदजी केडिया, सतीशजी पीम्पले, पंडित कैलाशनाथ मिश्रा आदि यावेळी उपस्थित होते. #KiranAgrawal #GorakshanAkola

Saraunsh published in Akola Lokmat on 21Jan. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240121_4_2&fbclid=IwAR12tNqBcLYzCka_fS6gKsb8cG9uCkmSf3hoQvHVwYxu3Jmk3aJxabeqgmk
https://www.lokmat.com/editorial/it-is-necessary-to-get-public-participation-in-the-campaign-of-cleanliness-a-a520-c310/?fbclid=IwAR23htdDgBHs-YFOfHC88d1NTIid3IrURDWTaDn7VrmmjIBXO1jX4tXPNhE

Saraunsh published in Akola Lokmat on 14 Jan. 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240114_2_9&fbclid=IwAR0UN8KJ6x6VuPWYd-omHP_HZcob1cR24xiRzmjBUi4226O6fOsqqhQVRpw

Saraunsh Published in Akola lokmat on Jan. 07, 2024

https://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20240107_2_4&fbclid=IwAR3QlKzEAmniftG8T-1SSU829pxWQuALB-RGFKdI6w3USWPVro9x6FxFb-s
https://www.lokmat.com/editorial/it-is-necessary-to-stop-the-growing-fearlessness-and-arrogance-a-a520-c310/?fbclid=IwAR1gGiX6O26H8tNP1ISX-M16ANTHnDZ9_Ya3v2t_1MhhNo6tm3CQuUacPd4