१२ मार्च ·
उत्तुंग व्यक्तिमत्वाशी भेटीचा योग...
आयुष्याच्या प्रवासात आजवर अनेकांशी भेटी झाल्या, त्यात संपन्नतेचा व मनःपूर्वक आनंदाचा प्रत्यय घडवणाऱ्या ज्या मोजक्या भेटी आहेत त्यात आणखी एक भेट लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द अवॉर्ड 2019 च्या निमित्ताने झाली, ती म्हणजे प्रख्यात शिल्पकार, पद्मभूषण राम सुतार यांची.
गांधीजींचे भारतासह जगभरात बसविलेले जवळपास ३५० पुतळे राम सुतार यांनी साकारले आहेत. अलीकडील नर्मदा काठावरील लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 522 फूट उंचीचे विश्वविक्रमी स्टॅच्यु ऑफ युनिटी घडविणारे, मुंबईनजिक अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे संकल्पित शिल्प साकारत असलेले राम काका धुळ्याचे.
मुंबईत भेटल्यावर त्यांना मी नाशिकचा म्हणून सांगताच त्यांनी मोठ्या कौतुकाने हात हाती घेऊन पाठीवर आशीर्वादाची थाप दिली. तो स्पर्श, त्यातून मिळालेली ऊर्जा, जिव्हाळा शब्दात मांडता येऊ नये.
Very proud to meet him ...
#MaharashtrianOfTheYear2019

No comments:
Post a Comment