१ ऑक्टोबर · 2019
लोकमतच्या महा गेम्सना उत्स्फूर्त प्रतिसाद ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होऊन त्यांना त्यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून देण्यासाठी लोकमत मॅरेथॉनच्या संयोजिका सौ रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. शासनाच्या क्रीडा विभागाच्या सहकार्याने विविध बारा क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत.
या महा गेम्सच्या नाशकातील उद्घाटन समारंभास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह जागतिक पातळीवर विविध क्रीडा प्रकारात नाशिकचे नाव उंचावणाऱ्या खेळाडुंची लाभलेली उपस्थिती लक्षवेधी ठरून गेली.
या स्पर्धांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता नाशिकची वाटचाल स्पोर्ट्स हब च्या दिशेने होत असल्याचे खात्रीने म्हणता यावे
#LokmatMahaGamesNashik2019

No comments:
Post a Comment