Thursday, December 19, 2019

Pandit Pohankar ji

१२ जून ·


काही भेटी या संपन्नता वाढविणाऱ्या असतात...
प्रख्यात शास्त्रीय गायक, किराणा घराण्याचे पंडित अजय पोहनकर जी यांच्याशी झालेली भेट त्यापैकीच एक. शिर्डी येथील दर्शन आटोपून नाशिकमध्ये आले असता पंडितजींशी भेट झाली व निवांत गप्पाही.
मा. राष्ट्रपती महोदयांच्याहस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविलेले, मध्यप्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार, महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार तसेच सुरमणी, माणिक रत्न, नारायण सन्मान आदी अनेक पुरस्कारांनी सन्मानित पंडितजींकडून 'ठुमरी' ऐकणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारे असते.
'पिया बावरी' या त्यांच्या अल्बमची मोहिनी तर लाखो कानसेनांना अक्षरशः वेड लावणारी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्याशी भेट व गप्पा हा अविस्मरणीय आनंदाचा भाग ठरला.
पंडितजींच्या बोलण्यातून अभिजात शास्त्रीय संगीताबद्दलची तळमळ ठायी ठायी ठिबकत होती. आज चॅनेल्सवर रिऍलिटी शो म्हणून जे काही सुरू आहे, त्यात अन रिअलच अधिक असल्याचं मत त्यांनी आवर्जून नोंदविले.
घराने से पहचान जरूर बनती है, लेकीन घरंदाज गायकी ही गायक को उचाई पर पहुचाती है... हे त्यांचे वाक्य तर खूप काही शिकवून जाणारे ....

No comments:

Post a Comment