Thursday, December 19, 2019

Gitai Foundation

२३ डिसेंबर, २०१८ ·



मातृभक्तीचा परिवर्तनवादी प्रत्यय...
गीताबाई... नागसेन नगर वस्तीत आयुष्य काढलेली व महापालिकेत सफाई कामगार म्हणून राब राब राबलेली सामान्य माता.
बुद्धाच्या तत्त्वावर व डॉ बाबासाहेबांच्या विचारांवर पक्की निष्ठा बाळगणाऱ्या तिच्या पोराने व सुनेने गीताई प्रतिष्ठान स्थापून या माऊलीच्या कृतज्ञतेची वंदना केलीय.
परिवर्तनवादी व समताधिष्ठित चळवळीची पालखी वाहणाऱ्या मनोहर अहिरे व अनिता पगारे तसेच त्यांची लेक कल्याणीने गेल्यावर्षी या मातेच्या स्मरणात शहिद गौरी लंकेशच्या नावाने दीप्ती राऊतला गौरविले, यंदा शहीद ननगेलीच्या नावाने पारधी समाजातील पुण्याच्या कार्यकर्त्या सुनीता भोसले यांना गौरविले. मी या दोन्ही क्षणांचा साक्षीदार. गेल्यावेळी पाहुणा म्हणून, तर यंदा कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून.
पत्रकार निरंजन टकले यांनाही यावेळी बोलावून मतदार व मतदानासारख्या लोकशाहीतील सर्वोच्च प्रक्रियेबद्दल जागर घडविला गेला.
चाळी, वस्ती वा पालावरील बांधवच नव्हे, एकूणच समाजापुढे सत्शील विचारांची शिदोरी सोडून जागरणाचा दिवा लावू पाहणारे अहिरे कुटुंबियांसारखे अवलीयेच खरे आशेचे किरण ठरावेत; आजच्या मतलबी व राजकारणाने डबडबलेल्या समाजसेवकांच्या प्रदर्शनी उपक्रमांनी कोणते समाजमन उजळावे असा प्रश्न असतांना आपल्यासारख्यांचे प्रयत्न पाहिले की आशा जागतात, जिवंत होतात
समाजातील 'नाहिरे' वर्गासाठी काम करणाऱ्या 'आहिरे' कुटुंबाला सलाम...

Good going Manohar, Anita n Dear Kalyani...

#gitai_foundation #kiran_agrawal #sunita_bhosle #niranjan_takle #manohar_ahire

No comments:

Post a Comment