७ ऑगस्ट ·
आमचा लोकमत सखी मंच म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणात खारीचा वाटा उचलणारे व्यासपीठ. नाशिक जिल्ह्यात तब्बल पंधरा हजाराहून अधिक भगिनी या सखी परिवाराच्या सदस्य आहेत. आज येवला दौऱ्यावरून परतताना निफाड येथील सखी प्रतिनिधींसोबत चर्चा केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची धडपड व इच्छा त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवली.
महत्त्वाचे म्हणजे त्यांचा परिचय करून घेताना राजश्री कऱ्हाड, नयना निकाळे, जयश्री भटेवरा व संगीता आहेर या भगिनी मूळच्या नाशिक येथील असून लग्न करून त्या निफाडला सासरी आल्याचे समजले. आज शहरातील मुली ग्रामीण भागात लग्नाला तयार नसतात, हे सामाजिक वास्तव पाहता या भगिनींचे कौतुक वाटले. या भगिनी अतिशय समाधानी व आनंदी असून सासर हेच माहेर असल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवली. कुटुंबात प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा, विश्वास असला की लहान मोठ्या शहराच्या मर्यादा संसाराच्या आड येत नाहीत हेच त्यांच्या सुखाचे रहस्य. खूप कौतुक वाटले त्यांचे.
ऐन तारुण्यात पतीवियोग वाट्यास येऊनही नाउमेद न होता, दोन मुलांची जबाबदारी पार पाडत मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक देणाऱ्या शारदा काळे भेटल्या. उद्या त्या श्रीलंकेला जात आहेत, त्यांच्या जिद्दीला व धडपडीला सॅल्युट करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
निफाड हे पुढाऱ्यांचे गाव, येथे नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष असलेल्या स्वाती गाजरे याही भेटल्या. आव्हानांचे आकाश कवेत घेण्याचे स्वप्न या भगिनींच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होते. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..
लोकमतचे सहा उपाध्यक्ष बी. बी. चांडक, इव्हेंट विभागाचे प्रमुख हेमंत पवार तसेच सचिन वायकोस, दुष्यंत पाराशर, उमेश मुंदडा यावेळी सोबत होते.
#LokmatSakhi #SakhiNifad

No comments:
Post a Comment