Thursday, December 19, 2019

Padwa Pahat 2018

९ नोव्हेंबर, २०१८ ·




सांस्कृतिक संस्कारांचे सिंचन...
पहाट ही नेहमीच प्रसन्न असते, पण या पहाटेला शब्द, सुरांचा साज लाभतो तेव्हा ती सुरेल, संपन्न व समृद्धही ठरून जाते.

नाशिककरांसाठी दिवाळी पाडवा व भाऊबीजेची पहाट अशीच नेहमीप्रमाणे यंदाही संपन्नता घेऊन आली.
नेहरू चौकातील पिंपळपारावर प्रख्यात गायक डॉ. भरत बलवल्ली, तर गंगापूररोड वरील प्रमोद महाजन उद्यानात प्रख्यात गायिका, पद्मश्री पदमजा फेणानी-जोगळेकर यांच्या स्वरवर्षावात नाशिककर न्हाऊन निघाले. भाभा नगरात उभरती गायिका अंजली गायकवाड व नंदिनी तसेच नाशिकचे संजय गीते यांनी रसिकांची मने जिंकली.

पिंपळपारावर संस्कृती नाशिकचे अध्यक्ष शाहू खैरे, प्रमोद महाजन उद्यानात आमदार प्रा. देवयानी फरांदे तर भाभा नगरात उपमहापौर प्रथमेश वसंत गीते यांनी या सांगितिक मैफिलींचे आयोजन केले होते. अन्यत्रही मान्यवर गायकांच्या पहाटेच्या व सांज मैफिली झाल्या. अभिजात सांस्कृतिक संस्कारांचे सिंचन यानिमित्ताने घडून येते आहे.
दर्दी नाशिककरांना श्रवण तृप्तीचा पुरेपूर आनंद मिळवून देणाऱ्या या आयोजकांचे खरेच कौतुक आहे...

#padwa_pahat #sanskruti #padmaja_fenani #balwalli #anjali_gaykwad

No comments:

Post a Comment