१५ ऑक्टोबर · 2019
मानवी शरीरात रक्तवाहिन्यांचे जे महत्व, तसे वा तितकेच वृत्तपत्र क्षेत्रात ते वितरण करणाऱ्या वितरक बांधवांचे. भल्या पहाटे जेव्हा आपण साखर झोपेत असतो तेव्हा हे बांधव ऊन, वारा व पाऊसाची तमा न बाळगता आपल्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचवितात. सण, वार असो की वैयक्तिक सुख - दुःखे; न चुकता अखंडितपणे सेवा बजावतात. व्यवस्थापन व वाचक यातील वाचन प्रेरणेचा ते दुवा बनतात.
आज वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र वितरक दिनानिमित्त सकाळी सकाळी या बांधवांसोबत काही वेळ घालविला. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञतेने लोकमततर्फे त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी नाशिकरोडच्या पेपरवाला चौकात वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील मगर, इस्माईल चाचा पठाण, महेश कुलथे, भरत माळवे, अनिल कुलथे, मधुकर सोनार, दिनेश पवार, अन्वरभाई पठाण आदींसमवेतची ही आनंदचित्रे...
#NewspapersVendersDay #LokmatVendersNashik #NashikPaperwala

No comments:
Post a Comment