Thursday, December 19, 2019

Police Run 2019

२४ फेब्रुवारी ·



मॅरेथॉन सिटी...
नाशिक रन, लोकमत मॅरेथॉन, मविप्र मॅरेथॉन व त्यापाठोपाठच्या पोलीस आयुक्तालयाने आयोजित मॅरेथॉनला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मॅरेथॉन सिटी म्हणून नाशिकचा लौकिक प्रस्थापित व्हावा.

नाशिक कन्या कविता राऊत, संजीवनी जाधव, मोनिका आथरे, किसन तडवी आदी धावपटूंनी आपल्या जिल्ह्याचे नाव साता समुद्रापार नेलेच आहे, आता सामान्य नाशिककरही आपल्या आरोग्याप्रति जागरूक झालेले दिसत आहे, मॅरेथॉन्सला लाभणारा प्रतिसाद त्याचेच निदर्शक आहे.
स्त्री पुरुष समानतेसह महिला सुरक्षेचा संदेश देत नाशिक पोलिसांनी आयोजिलेली मॅरेथॉनही अपूर्व उत्साहात पार पडली. यासाठी लोकसहभाग मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या पोलीस आयुक्त डॉ रवींद्रकुमार सिंगल व त्यांच्या टीमचे परिश्रम खरेच कौतुकास्पद आहेत

या मॅरेथॉनप्रसंगी डॉ सिंगल, अभिनेत्री विद्या करंजीकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार योगेश घोलप, शैलेंद्र तनपुरे, महापौर रंजना भानसी, विश्वास ठाकूर, हिमगौरी आडके, शैलेश कुटे, समीर रकटे, गिरीश पोतदार, अपूर्वा जाखडी, आदींसमवेतची काही छायाचित्रे...

No comments:

Post a Comment