१६ सप्टेंबर · 2019
बाबाज थिएटरची अभिनंदनीय वाटचाल..
प्रशांत जुन्नरे... नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सुपरिचित नाव. खिसा रिकामा असतांनाही, प्रतिकुलतेत नाट्य, संगीत आदी अभिजात कला व कलाकारांसाठी त्यांची सदा काही न काही धडपड सुरूच असते. त्यांच्या #बाबाज थिएटरच्या 19व्या वर्धापनदिनी प्रख्यात संगीतकार, पद्मश्री पंडित हृदयनाथ जी मंगेशकर यांच्याशी पुन्हा भेटीचा योग आला. अर्थात त्यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांमधून त्यांची भेट सदोदित होतच असते हा भाग वेगळा.
मित्रवर्य विनायक रानडे, अभय ओझरकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, संतोष हुदलीकर, डॉ मिलिंद पिंप्रीकर, डॉ सुमुखी अथनी यांचा या सोहळ्यातील सन्मान आनंददायी ठरला. तसेच पंडितजींनी यावेळी प्रशांत भाईस मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार घोषित करून त्याच्या धडपडीस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, हे अवघ्या नाशिककरांसाठी भूषणावह ठरावे.
आम्हास अभिमान आहे प्रशांत भाई आपला...
#Babaj #HrudaynathMangeshkar #PrashantJunnare #KiranAgrawal

No comments:
Post a Comment