Thursday, December 19, 2019

Youth Parliyament

25 जानेवारी · 2019


उद्याची आशा, भविष्यातील आवाज...
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशपातळीवर होत असलेल्या नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिव्हल (युवा संसद) च्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा परिक्षक म्हणून आज तरुणांच्या भावना जाणून घेता आल्या.

दहशतवाद, आर्थिक परिस्थिती, हवामान, खेलो इंडिया अश्या विषयांवर मुले भरभरून बोलत होती. विषयाचे आकलन, जाण तर प्रगल्भ होतीच, त्यातील संवेदनाही जाणवणारी होती. शेवटी या वक्तृत्वातुनच या तरुणाईचे कर्तृत्व बहरणार असून, ते त्यांना नेतृत्वही मिळवून देणार आहे. मा. पंतप्रधानांनाही तेच अपेक्षित आहे.

निफाडच्या महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार हरिश्चंद्र चव्हाण, मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार, माणिकराव बोरस्ते, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील आदींच्या उपस्थितीत झाले.

योगायोग म्हणजे, आज राष्ट्रीय मतदार दिन असल्याने प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार दीपक पाटील, पोलीस अधिकारी विष्णू आव्हाढ व प्राचार्य डॉ आर एन भवरे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना लोकशाहीचे पावित्र्य राखण्याबद्दलची शपथही देण्यात आली

No comments:

Post a Comment