Thursday, December 19, 2019

Gaw Mamach Harwla

२९ डिसेंबर, २०१८ ·



गांव मामाचं हरवलं ...
खरंय, आज मामाचं गावं हरवल्यासारखच झालंय. नवी पिढी मामाच्या ममत्वाला मूकताना दिसतेय. नात्याचा बंध सैल होतोय.
अशा वातावरणात त्या मायेच्या ओलाव्याकडे नेत पशु पक्षी, निसर्गाच्या साक्षीने समाजातील वंचितांच्या जगण्याला शब्दबद्ध करणारा बाल कवितासंग्रह म्हणजे 'गाव मामाचं हरवलं'
माझे लोकमतमधील सहकारी मित्र, मुख्य उपसंपादक श्री संजय वाघ यांच्या सामाजिक कळवळयातून व संवेदनेतून हा कविता संग्रह प्रसवला आहे याचा विशेष आनंद आहे. पत्रकारिता करतांना तसेच बातमी मागील व्यथा, वेदना व कारुण्य शोधतानाच त्यातील सौन्दर्य टिपून ते कवितेच्या माध्यमातून मुलांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न केवळ कौतुकास्पदच नव्हे तर अभिमानास्पदही आहे.

बालभारतीच्या किशोर मासिकाचे संपादक श्री किरण केंद्रे, कोल्हापूरचे समीक्षक श्री रणधीर शिंदे, खादेशच्या अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले ज्येष्ठ साहित्यिक रामदास जी वाघ, हृदयरोग तज्ज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, कालिका संस्थानचे अध्यक्ष श्री केशवराव अण्णापाटील आदीच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला
Proud of u Sanjay wagh...

No comments:

Post a Comment