Thursday, December 19, 2019

Naty Parishad

८ फेब्रुवारी · 2019



नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानिमित्त बाल कलावंतांच्या भेटी झाल्या.
त्यांची नाटके, अभिनय व अन्य बॅक स्टेजची कामे पाहता कमी वयात मुले प्रगल्भ होत चालल्याचे लक्षात यावे.
विशेष म्हणजे इगतपुरीसारख्या आदिवासी भागातील म. गांधी हायस्कुलच्या मुलांनी अभिनित 'आम्हाला शाळा पाहिजे' नाट्य प्रथम आले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनच्या मुलांचे 'रिले' द्वितीय तर विद्या प्रबोधिनीच्या 'ताटी उघडा' ने तृतीय क्रमांक पटकावला.
नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष प्रा रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्यामुळे हा योग जुळून आला.

No comments:

Post a Comment