Tuesday, December 24, 2019

Yoga Day 2019

२१ जून · 2019



योगामुळे प्रसन्न झाली पहाट ...
जागतिक योग दिनानिमित्त आज कधी नव्हे ते सकाळी लवकर उठण्याचा योग आला. लोकमत व योग विज्ञान प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित योग शिबिरात सहभागी होऊन योगा करताना वेगळ्याच आनंद, उत्साह तसेच ऊर्जेची अनुभूती आली. डॉ. प्रेमचंद जैन व डॉ. सौ किरण जैन यांच्या शास्त्रशुद्ध योगाच्या मार्गदर्शनाने आजची पहाट प्रसन्न झाली.
अर्थात योग ही केवळ एक दिवसाची अथवा शिबिरापुरती करायची क्रिया नसून ती आयुष्यभर करावयाची प्रक्रिया आहे हेच खरे. त्यामुळे यापुढेही त्यात सातत्य ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया.
विचारांचा अनुलोम - विलोम करूया.......
चांगला, सकारात्मक विचार आत घेऊया
वाईट, नकारात्मक विचार बाहेर टाकूया...

#LokmatYoga2019 #YogaDay

No comments:

Post a Comment