At present, working as a Executive Editor of Lokmat, Akola(Maharashtra). Known as a "Saraunshkar", because "Saraunsh" columns are written every Sunday on political and social issues. For excellence in journalism, honoured with Shanti Bhushan Puraskar, Girna Gaurav, Darna Gaurav, Shiva Gaurav, Vivekanand Yuva Gaurav, Maharashtra Govt Vikas Varta etc. Also awarded by "AGRASHRI". Participates in various debates on news channels.
Monday, December 30, 2019
#Editors View published in Online Lokmat on 26 Dec, 2019
परिचितांची लांडगेशाही रोखण्याचे आव्हान !
किरण अग्रवाल
देशात विविध ठिकाणी घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे महिला हिंसाचाराचा व त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय करता येईल, याचा विषय सध्या चर्चेत आला आहे खरा; पण या अशा घटनांतील बाह्य व्यक्तींच्या त्रासाबरोबरच कुटुंबातीलच अगर परिचितांकडून होणाऱ्या छळाच्या प्रकारांतून कसे बचावता यावे हादेखील चिंतेचा मुद्दा ठरला आहे; कारण सुरक्षेची खात्री म्हणून समाजमान्य असलेल्या ज्या कुंपणांकडे पाहिले जाते, ती कुंपणंही काही ठिकाणी शेत खाऊ लागल्याची उदाहरणे पुढे येत आहेत. कायद्याच्या धाकाखेरीज ढळू लागलेली नैतिकता व अस्तंगत होऊ पाहणारे सामाजिक भय याकडे लक्ष वेधले जाणे त्यामुळेच गरजेचे बनले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी समाजमन अस्वस्थ झाले आहे, अशा प्रकरणातील आरोपी हाती लागताच कायदा हाती घेऊन त्याला शिक्षा देण्याचे प्रकारही घडू लागल्याने समाजाची चीड किती टोकाला पोहोचली आहे हे लक्षात यावे. अर्थात, याबाबतीत पोलीस खात्यानेही सजग होत विविध शहरांत निर्भया पथके नेमून महिलांच्या संरक्षणाकडे अधिक लक्ष पुरविले आहे. याबाबत कायदेशीर उपायांखेरीज जनजागृती मोहीमही हाती घेण्यात आली असून, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने नाशकात एक चर्चासत्रही घेण्यात आले. यात ‘मर्दानी’ चित्रपटात पोलीस अधिका-याची भूमिका साकारणा-या राणी मुखर्जीसह मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे व अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. याचपाठोपाठ नाशकात तिसरी महिला हिंसाचारमुक्ती परिषदही पार पडून त्यात एकूणच महिलांच्या हिंसेबाबत व्यापक मंथन घडून आले. या विषयाची गंभीरता व त्याची घेतली जात असलेली दखल यानिमित्ताने अधोरेखित व्हावी. पण हे होत असताना विशेषत: स्वकीय, आप्तेष्ट अगर परिचितांकडून जे अत्याचार होतात, ती लांडगेशाही रोखण्याचेही मोठे आव्हान असल्याचे दुर्लक्षिता येऊ नये.
पित्यानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याच्या वार्ता अधून-मधून समोर येतात तेव्हा नात्याला काळिमा फासला गेल्याची चर्चा घडून येते. तसेही अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अधिकतर घटनांमध्ये आरोपी हा परिचितच असतो हे वेळोवेळी आढळून आले आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीची नाशकातीलच एक घटना घ्या, पैसे कमाविण्याच्या हेतूने एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीला देहविक्रीसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार नोंदविली गेली आहे. याप्रकरणी पीडितेच्या पित्यासह सावत्र आईसही अटक केली गेली आहे. या प्रकाराकडे प्रातिनिधिक म्हणून बघता यावे. नैतिकतेचा कडेलोट घडविणा-या या प्रकारांमुळे समाजाची किती अधोगती होत चालली आहे हे तर लक्षात यावेच, परंतु कायद्याचा धाक न बाळगण्याबरोबरच समाजाचे म्हणून असणारे भयही आता कुणी बाळगेनासे झाल्याचेही यातून स्पष्ट व्हावे. चिंता व चिंतनाचाही मुद्दा हाच आहे. का व कशामुळे होतोय हा -हास?
आज प्रत्येकच जण मी व माझ्यात गुरफटला आहे. शेजारी काय चालले आहे याच्याशी कुणाला काही देणे-घेणे उरलेले नाही. स्वयंकेंद्री एकारलेपण यातून बळावत चालले आहे. नवीन पिढीच नव्हे, तर ज्येष्ठांनीही स्वत:हून आपल्या मर्यादा आखून घेतल्या आहेत. त्यामुळे चुकीचे काही करणाऱ्यांना दटावणारेच कुटुंबात व समाजातही कुणी उरले नाही. दोन दिवसांपूर्वीच साने गुरुजींची जयंती झाली. त्यानिमित्त संस्काराची शिंपण करणा-या त्यांच्या श्यामची आई व गोड गोष्टींची आठवण अनेकांनी केली; पण आज किती आई-बाबा अथवा आजी-आजोबा आपल्या मुला-नातवंडांना या संस्कारित करणा-या गोष्टी ऐकवतात किंवा वाचायला देतात? मुळात त्यांनाच मोबाइलमधून डोकं वर करायला वेळ नाही आणि टीव्हीच्या मालिका बघण्यातून उसंत. त्यामुळे घरात, कुटुंबात नैतिकतेची, संस्कारांची जी रुजुवात व्हायला हवी तीच दुरापास्त होत चालली आहे. जो आदरयुक्त धाक वाटायला हवा, तोच लयास चालला आहे. आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले हे संकट आहे. घरातच कुणी धाक बाळगत नाही म्हटल्यावर शेजारचा, गल्लीतला तरी कोण कशाला असले भय बाळगेल? अपप्रवृत्ती, अनाचाराला यातून पोषकता लाभणे स्वाभाविक ठरते. परिचितांकडून घडून येणारी लांडगेशाही ही यातीलच पुढची पायरी. तेव्हा, हे टाळायचे असेल तर प्रत्येकानेच आपापल्या परीने काळजी घ्यायला हवी... जागते रहो!
https://www.lokmat.com/editorial/stop-violence-against-women/

Wednesday, December 25, 2019
Tuesday, December 24, 2019
Lokmat Paliamentary Awards
23 Dec, 2019
नाशिकला लाभलेल्या सन्मान व संधीचा आनंद...
दिल्लीत नुकत्याच झालेल्या लोकमत पार्लमेंटरी अवॉर्ड सोहळ्यात दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती ताई पवार यांना सर्वोत्कृष्ट नवोदित महिला खासदार म्हणून मा. उपराष्ट्रपती जी व अन्य मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर पवार यांनी सन्मानचिन्हासह नाशिक लोकमत कार्यालयास भेट देत सहकाऱ्यांबरोबर आनंद व्यक्त केला व लोकमत समूहाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
#LokmatParliamentaryAwards #DrBhartiPawar #LokmatNashik

Shelter expo 2019
२२ डिसेंबर रोजी ८:५१ PM वाजता ·
घराच्या चार भिंतीला घरपण लाभते ते त्यातील माणसांबरोबरच त्या घराची रचना, ठेवण वा सजवटीतून. नाशकात असे घरपण अनेकांना उपलब्ध करून देणाऱ्यांची संस्था म्हणजे क्रेडाई.
या क्रेडाई नाशिक मेट्रो आयोजित शेल्टर 2019 प्रदर्शनाला आज भेट दिली. अतिशय नीट नेटक्या व आकर्षक मांडणीतून या प्रदर्शनाद्वारे Wow Nashik Now Nashik चे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला गेला. क्रेडाईचे अध्यक्ष श्री उमेश वानखेडे, रवी महाजन, कृणाल पाटील व त्यांच्या टीमचे परिश्रम यामागे राहिले.
क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री राजीव पारीख (कोल्हापूर) यांच्यासह सर्वश्री ललित जी रुंगठा, सुजॉय गुप्ता, नरेश भाई कारडा, दीपक जी बागड, जयेश भाई ठक्कर, सुनील कोतवाल, सुरेश अण्णाजी पाटील, अनिल जैन, मनपा स्थायी सभापती उद्धव निमसे, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते, डॉ मुकेश अग्रवाल आदी मान्यवरांच्या भेटी यात झाल्या..
Congrats Umesh Wankhade ji n Team, for grand success of Shelter 2019
#Shelter2019 #CredaiNashik #KiranAgrawal

Lokmat NashikRd. Anni 2019
१६ डिसेंबर रोजी ६:५८ PM वाजता ·
बोचऱ्या थंडीत स्नेहाची ऊब ...
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लोकमतच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लाऊन लोकमतवरील प्रेम व्यक्त केले. सायंकाळी काहीसा गारवा असला तरी वाचक प्रेमाची व स्नेहाची ही ऊब ऊर्जा देणारी ठरली, यापुढेही हा स्नेह वृद्धिंगत होत राहील यात शंका नाही.
धन्यवाद नाशिकरोडकर, आपण लोकमतवर केलेल्या या स्नेह वर्षावाबद्दल...
#LokmatNashikRd

News18 Lokmat Nashik sanman 2019
१३ डिसेंबर रोजी ११:०२ AM वाजता ·
NEWS18 लोकमत प्रस्तुत नाशिक सन्मान सोहळा नुकताच पार पडला...
विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या दिग्गजांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यात मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, रांगोळीकार नारायण चुंबळे, पर्यावरण क्षेत्रातील शेखर गायकवाड, विशेष सरकारी वकील अजय मिसर, हेमलता ताई बिडकर, प्रा रमेश वरखेडे, अभिलाष गोरे, योगेश गुप्ता अशा मान्यवरांचा समावेश होता.
या सन्मानार्थी निवड समितीत दुसऱ्याही वर्षी काम बघण्याची संधी लाभली. सोबत कुलगुरू डॉ ई वायूनंदन सर, आमदार हेमंत टकले व प्रा डॉ दिलीप फडके होते. त्यानिमित्त सोहळ्यात चॅनलचे संपादक श्री महेश म्हात्रे यांच्याहस्ते सन्मान व मनोगताप्रसंगीची आठवणचित्रे ...
Thanks to Prashant Bag ji n team News18 लोकमत...
#NashikSanman #KiranAgrawal

Lokmat Maha Marethon 2019
३ डिसेंबर रोजी १०:२२ AM वाजता ·
मनुष्य तसाही आयुष्यभर धावतच असतो, पण ती धावाधाव वेगळी अन आरोग्यासाठीची धाव वेगळी. म्हणूनच निरामय आरोग्याचा संदेश देण्यासाठी लोकमततर्फे #नाशिक_महामॅरेथॉन घेण्यात आली.
@RuchiraDarda यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या #लोकमत_महामॅरेथॉन च्या तिसऱ्या पर्वात गुलाबी थंडीत, अपूर्व उत्साहात सात हजारांहून अधिक धावपटू व आबालवृद्ध धावले. उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगीची काही आनंदचित्रे...
@MiLOKMAT initiative @MahaMarathon
#BhaagoRe #CrossTheLine #SaraMaharashtraBhaageGa #KiranAgrawal #LokmatNashik

Marethon 3
१६ नोव्हेंबर ·
To #CrossTheLine है तैय्यार हम...
सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी @RuchiraDarda यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून साकारलेल्या लोकमत महामॅरेथॉनच्या तिसऱ्या आवर्तनाची सुरुवात नाशकात 1 डिसेंबर रोजी होत आहे, त्यासाठी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर सराव...
For Marathon registration
www.mahamarathon.com
@MiLOKMAT initiative#BhaagoRe #saraMaharashtraBhaageGa

Education Day
११ नोव्हेंबर ·
आज राष्ट्रीय शिक्षण दिन ... भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाने नवीन शैक्षणिक धोरण २०१९ चा जो मसुदा तयार केला आहे त्यावर शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सर्वश्री हर्षवर्धन कडेपूरकर, महेश दाबक, दिलीप बेलगावकर, चंद्रकांत बोरसे, नंदू पवार, पुरुषोत्तम ठोके, राजेंद्र निकम, सचीन जोशी, डॉ. प्रिन्स शिंदे आदींशी ‘लोकमत’ च्या व्यासपीठावर चर्चा करण्यात आली, त्याप्रसंगीचे छायाचित्र...
#NationalEducationDay #LokmatVicharVimarsh

Dr. Pagare Pradarshan
२ नोव्हेंबर · नाशिक ·
80 वर्षाच्या तरूणाने भरविलेले प्रदर्शन...
प्रबळ इच्छाशक्ती, तिच्या जोडीला कल्पनाशक्ती आणि समाजाला काहीतरी देण्याची भावना मनात असली की तिथे वयाची बंधने गळून पडतात. नाशिकरोडचे ऍड. एम. एस. पगारे हे त्याचेच उदाहरण.
वयाची 80 पार केलेल्या पगारे यांनी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या निसर्ग व मानव संबंधाशी संबंधित छायाचित्रांचे तसेच सकारात्मक बातम्यांच्या कात्रणाचे संकलन करून त्याचे प्रदर्शन नाशिकरोडच्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या आर्ट गॅलरीत भरविले आहे. त्याच्या उदघाटनप्रसंगी ब्रह्मकुमारी सक्तीदीदी, पी एन गाडगीळ पेढीच्या व्यवस्थापिका प्रणिता दुसाने व आयोजक पगारे आदींसह ...
13 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असणार आहे

Padmaja Fenani Mangalpahat
२८ ऑक्टोबर ·
आज अंगणी सोनचाफ्याची पाऊले ...
दिवाळी पाडव्यानिमित्त लोकमत सखी मंच व सुयोजित लाईफ वनतर्फे नाशकात गोदातटी उजळताहेत पद्मजा फेणीणी जोगळेकर यांच्या स्वरांचे मंगलदीप ...
जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, गायिका अलका देव मारुळकर, सुयोजितचे अनंत राजेगावकर, सुनील जैन, क्रेडाईचे उमेष वानखेडे, सुनील कोतवाल, सुरेश अण्णाजी पाटील, बाबा दातार आदी आहेत उपस्थित @MiLOKMAT
#LokmatPadwaPahat #NashikPadwaPahat #LokmatPadmajaFenani

Diwali 2019
२७ ऑक्टोबर ·2019
लोकमत मधील लक्ष्मीपूजन...
प्रत्येक घरातील गृहलक्ष्मी हीच खरी भाग्याची, सुख समृद्धीची मूर्तिमंत प्रतीक असते. त्यामुळे तिचाच मान आज महत्वाचा.
यंदा विशेषतः सौ किरण भाभी व चि सौ श्वेता चांडक या लक्ष्मींच्या उपस्थितीत आमचे लक्ष्मीपूजन झाले. आनंदाचा दुग्धशर्करा योगच हा ...
Happy Diwali to Dear all
#LokmatDiwali2019 #LokmatNashik

Hawkers Day 2019
१५ ऑक्टोबर · 2019
मानवी शरीरात रक्तवाहिन्यांचे जे महत्व, तसे वा तितकेच वृत्तपत्र क्षेत्रात ते वितरण करणाऱ्या वितरक बांधवांचे. भल्या पहाटे जेव्हा आपण साखर झोपेत असतो तेव्हा हे बांधव ऊन, वारा व पाऊसाची तमा न बाळगता आपल्यापर्यंत वृत्तपत्र पोहोचवितात. सण, वार असो की वैयक्तिक सुख - दुःखे; न चुकता अखंडितपणे सेवा बजावतात. व्यवस्थापन व वाचक यातील वाचन प्रेरणेचा ते दुवा बनतात.
आज वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र वितरक दिनानिमित्त सकाळी सकाळी या बांधवांसोबत काही वेळ घालविला. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञतेने लोकमततर्फे त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी नाशिकरोडच्या पेपरवाला चौकात वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील मगर, इस्माईल चाचा पठाण, महेश कुलथे, भरत माळवे, अनिल कुलथे, मधुकर सोनार, दिनेश पवार, अन्वरभाई पठाण आदींसमवेतची ही आनंदचित्रे...
#NewspapersVendersDay #LokmatVendersNashik #NashikPaperwala

Lokmat Kaldarshika 2019
२ ऑक्टोबर · 2019
आदिशक्तीचा आशीर्वाद... नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेलाच आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची संधी लाभली. 2020 ची लोकमत कालदर्शिका मातेच्या चरणी अर्पण करून कालदर्शिकेचे प्रकाशन स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्ती चरणदास व सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे विश्वस्त आर्कि. उन्मेष गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले.
यंदा श्री श्री रविशंकर जी, प्रल्हाद पै, डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आदि अध्यात्मिक मान्यवरांच्या लेखासह या कालदर्शिकेतून विविध विषयांची मेजवानी मिळणार आहे
मराठी माणसांच्या घराघरातील भिंतीवर विराजमान होणारी ही कालदर्शिका म्हणजे केवळ पंचांग किंवा दिनदर्शिका नसून खाद्य, आरोग्य, कला असे अनेक उपयुक्त विषय त्यात मांडण्यात आले आहेत. प्रत्येकाने घ्यावी अशी आहे ही, लोकमत कालदर्शिका 2020. त्यासाठी नजीकच्या कुठल्याही लोकमत कार्यालयात अथवा लोकमत प्रतिनिधीशी संपर्क साधावा

Lokmat Mahagames 2019
१ ऑक्टोबर · 2019
लोकमतच्या महा गेम्सना उत्स्फूर्त प्रतिसाद ...
शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण होऊन त्यांना त्यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून देण्यासाठी लोकमत मॅरेथॉनच्या संयोजिका सौ रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. शासनाच्या क्रीडा विभागाच्या सहकार्याने विविध बारा क्रीडा प्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत.
या महा गेम्सच्या नाशकातील उद्घाटन समारंभास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवरांसह जागतिक पातळीवर विविध क्रीडा प्रकारात नाशिकचे नाव उंचावणाऱ्या खेळाडुंची लाभलेली उपस्थिती लक्षवेधी ठरून गेली.
या स्पर्धांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता नाशिकची वाटचाल स्पोर्ट्स हब च्या दिशेने होत असल्याचे खात्रीने म्हणता यावे
#LokmatMahaGamesNashik2019

Maha Games 2019
३० सप्टेंबर · 2019
नाशिकची आशा...
लोकमतच्या महा गेम्स स्पर्धांना आज पंचवटीतील स्व मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये उत्साहात सुरुवात झाली. नाशिकचे नाव क्रीडा क्षेत्रात जागतिक पातळीवर उंचावणारे व भविष्यातही अथेलिट, बुद्धिबळ, क्रिकेट, नेमबाजी आदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आशेचे केंद्रबिंदू ठरलेले मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी, ताई बामणे, पुनम सोनवणे, प्रचिती चंद्रात्रे, सुधांशु नायर, जयश्री टोके, कोमल जगदाळे आदीं समवेत एक आनंदचित्र टिपत असताना छायाचित्रकार राजू ठाकरे यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केलेला क्षण ...

Media n Medico
३० सप्टेंबर ·
मीडिया व मेडिकल ... दोन्ही क्षेत्रात सेवाभाव हा स्थायी स्वरूपात आहे. त्यामुळे The Nashik Obstetric and Gynecological Society च्या कार्यक्रमात मीडिया व मेडिको लीगल आस्पेक्त या विषयावर बोलताना हाच संबंध परस्परात अधिक दृढ करण्याबाबत बोलायची संधी लाभली.
या प्रसंगी डॉ नलिनी बागुल, डॉ निवेदिता पवार, डॉ उमेश मराठे, डॉ प्रशांत देवरे, डॉ रविराज खैरनार आदींसमवेत ..
Thanks to Dr. Nivedita Bhavre Pawar, त्यांच्यामुळे ही संधी लाभली.

Pandit Hrudaynathji Mangeshkar
१६ सप्टेंबर · 2019
बाबाज थिएटरची अभिनंदनीय वाटचाल..
प्रशांत जुन्नरे... नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रातील सुपरिचित नाव. खिसा रिकामा असतांनाही, प्रतिकुलतेत नाट्य, संगीत आदी अभिजात कला व कलाकारांसाठी त्यांची सदा काही न काही धडपड सुरूच असते. त्यांच्या #बाबाज थिएटरच्या 19व्या वर्धापनदिनी प्रख्यात संगीतकार, पद्मश्री पंडित हृदयनाथ जी मंगेशकर यांच्याशी पुन्हा भेटीचा योग आला. अर्थात त्यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांमधून त्यांची भेट सदोदित होतच असते हा भाग वेगळा.
मित्रवर्य विनायक रानडे, अभय ओझरकर, विजयालक्ष्मी मणेरीकर, संतोष हुदलीकर, डॉ मिलिंद पिंप्रीकर, डॉ सुमुखी अथनी यांचा या सोहळ्यातील सन्मान आनंददायी ठरला. तसेच पंडितजींनी यावेळी प्रशांत भाईस मंगेशकर प्रतिष्ठानचा पुरस्कार घोषित करून त्याच्या धडपडीस वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, हे अवघ्या नाशिककरांसाठी भूषणावह ठरावे.
आम्हास अभिमान आहे प्रशांत भाई आपला...
#Babaj #HrudaynathMangeshkar #PrashantJunnare #KiranAgrawal

Nashik Citizen Foram
३० ऑगस्ट · 2019
कार्यक्षम नगरसेवकांचा गौरव ...
महापालिकेचा कारभार व तेथील नगरसेवक म्हटले की डोळ्यासमोर गोंधळ, गडबडच येतो, पण तेच आणि तेवढेच खरे नाही. जनतेच्या समस्या सोडवत विकासाच्या अपेक्षापूर्तीसाठी धडपड करणारेही बरेच नगरसेवक आहेत. त्यातीलच श्री अशोक मुर्तडक, शिवाजीराव गांगुर्डे व हिमगौरी आडके या तिघांना नाशिक सिटीजन फोरम तर्फे कार्यक्षम नगरसेवक म्हणून गौरविण्यात आले.
या निवड समितीचा अध्यक्ष म्हणून मला काम पाहायला मिळाले, त्यात अर्थातच सहकारी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार मित्र अभिजित कुलकर्णी, वैशाली बालाजीवाले व सचिन अहिरराव यांचे सहकार्य महत्वाचे ठरले.
या गौरव सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे यांच्यासह सिटीझन फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग, नवनिर्वाचित अध्यक्ष हेमंतभाई राठी, संस्थापक अध्यक्ष विक्रमभाऊ सारडा, जितूभाई ठक्कर, डॉ नारायण विंचूरकर, दिग्विजय कपाडिया, आशिष कटारिया, अविनाश पाटील आदी स्नेहींच्या भेटी व गप्पा झाल्या.
#NCF #NashikCitizensForam

Nifad Sakhi
७ ऑगस्ट ·
आमचा लोकमत सखी मंच म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणात खारीचा वाटा उचलणारे व्यासपीठ. नाशिक जिल्ह्यात तब्बल पंधरा हजाराहून अधिक भगिनी या सखी परिवाराच्या सदस्य आहेत. आज येवला दौऱ्यावरून परतताना निफाड येथील सखी प्रतिनिधींसोबत चर्चा केली. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची धडपड व इच्छा त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवली.
महत्त्वाचे म्हणजे त्यांचा परिचय करून घेताना राजश्री कऱ्हाड, नयना निकाळे, जयश्री भटेवरा व संगीता आहेर या भगिनी मूळच्या नाशिक येथील असून लग्न करून त्या निफाडला सासरी आल्याचे समजले. आज शहरातील मुली ग्रामीण भागात लग्नाला तयार नसतात, हे सामाजिक वास्तव पाहता या भगिनींचे कौतुक वाटले. या भगिनी अतिशय समाधानी व आनंदी असून सासर हेच माहेर असल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवली. कुटुंबात प्रेम, आपलेपणा, जिव्हाळा, विश्वास असला की लहान मोठ्या शहराच्या मर्यादा संसाराच्या आड येत नाहीत हेच त्यांच्या सुखाचे रहस्य. खूप कौतुक वाटले त्यांचे.
ऐन तारुण्यात पतीवियोग वाट्यास येऊनही नाउमेद न होता, दोन मुलांची जबाबदारी पार पाडत मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक देणाऱ्या शारदा काळे भेटल्या. उद्या त्या श्रीलंकेला जात आहेत, त्यांच्या जिद्दीला व धडपडीला सॅल्युट करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
निफाड हे पुढाऱ्यांचे गाव, येथे नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष असलेल्या स्वाती गाजरे याही भेटल्या. आव्हानांचे आकाश कवेत घेण्याचे स्वप्न या भगिनींच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसत होते. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..
लोकमतचे सहा उपाध्यक्ष बी. बी. चांडक, इव्हेंट विभागाचे प्रमुख हेमंत पवार तसेच सचिन वायकोस, दुष्यंत पाराशर, उमेश मुंदडा यावेळी सोबत होते.
#LokmatSakhi #SakhiNifad

Lokmat Sinner Anni 2019
25 जुलै · 2019
तोच स्नेह, तेच आपलेपण...
सिन्नर लोकमतच्या वर्धापनदिनी प्रतिवर्षाप्रमाणे त्याच ओढीने वाचक, स्नेहींच्या भेटी झाल्या. परंपरिकपणे सायंकाळऐवजी यंदा दुपारी कार्यक्रम घेतल्याने ग्रामीण भागातील वाचकही मोठ्या संख्येने भेटीला आले व लोकमतबद्दल भरभरून बोलले.
ज्येष्ठ नेते प्रकाशसेठ वाजे, पुंजाभाऊ सांगळे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार सुधीर तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शीतल सांगळे, नगराध्यक्ष किरण डगळे , जि. प. सदस्य सीमंतिनी कोकाटे, सुदामशेठ सांगळे, नामकर्ण आवारे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, गट विकास अधिकारी डॉ लता गायकवाड, प्राचार्य डॉ दिलीप शिंदे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छानी लोकमत परिवार अक्षरशः चिंब झाला.
सिन्नरचे सर्व सहकारी शैलेश कर्पे, सचिन सांगळे, दत्ता दिघाळे, बाळासाहेब वाघ, सिराज कादरी, पंकज वाले, कृष्णा वावधने आदींच्या परिश्रमाची व जनसंपर्काची पावती यानिमित्ताने मिळाली
Thanks Sinnerkars... प्रेम राहू द्या।
#LokmatSinner

Subscribe to:
Posts (Atom)